आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

उसाला 4500 रु  दर  मिळवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा

राजेंद्र गड्यान्नवर यांचे सिरसंगी, वाटंगी किने परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन मंगळवार 27 रोजी  नेसरी मोटारसायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन

सिरसंगी : उसाला प्रतिटन 4500 रुपये दर मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्र गड्यान्नवर यांनी सिरसंगी येथे केले.

यावेळी   संतोष कांबळे यांनी स्वागत करून  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळवण्यासाठी  मोटर सायकल रॅलीत  सहभागी होण्ायविषयी आवाहन केले . यावेळी स्वाभिमानी संघटनेचे सखाराम केसरकर यांनी प्रास्ताविक केले

स्वाभिमानी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नवर यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी इथेनॅाल दरात वाढ व्हावी  व साखरेची आधारभूत किमत वाढवावी अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे , याबबात केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी व कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्याबरोबर बैठका घेतल्या संदर्भात   माहिती दिली, मागील आंदोलनात कर्नाटकातील शेतकरी लाख संख्येने उतरल्याचे सांगितले म्हणून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले तरच आपल्या उसाला दर मिळू शकतो , त्यासाठी   शेतकऱ्यांनी दि. २७ रोजी नेसरी येथे होणाऱ्या मोटारसायकल रॅलीत सहभागी व्हावे, तसेच सायंकाळी धामणे येथे आयोजित सभेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली. ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलनात सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी  वसंत दळवी , सुभणा दळवी , केरबा कुंभार , धोंडीबा कुंभार , मारुती कुंभार  यांचेहस्ते राजेंद्र गड्यान्नवर यांचा सत्कार करण्यात आला , यावेळी  रमेश देसाई , अमृत देसाई, शिवाजी होडंगे , दत्तात्रय देसाई , पांडुरंग टकेकर , थळब कांबळे , बाळू कुंभार , सागर कुंभार , परशराम चौगले , दीपक चौगले , चाळू चौगले , नंदकूमार दळवी  यांच्यासह गावातील शेतकरीवर्ग मोट्या संख्येने उपस्थित होता .

संबंधित बातम्या

कोळींद्रे गावची महालक्ष्मी यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी

किणे वार्ताहर: कोळींद्रे (ता. आजरा) गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा ११ व १२ मे २०२७ रोजी आयोजित…

ByByMahadev Kudav Oct 18, 2026

सिरसंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ; ऊस-भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बिबट्याचीही दहशत कायम; कुत्र्यांचे अवशेष आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण सिरसंगी, ता. आजरा : एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक…

ByByMahadev Kudav Oct 17, 2026

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top