आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत
Image

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :
गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात ठिकठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली असून, विविध ठिकाणी विद्युत रोषणाई आणि देखावे उभारण्यात आले आहेत. गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची लगबग सुरू होती. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत आणि बाप्पाचा जयघोष करत गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सिरसंगी, किणे, वाटंगी आणि कोळींद्रे परिसरातील विविध गावांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सव काळात गावागावांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, आरती, भजन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांमुळे पुढील काही दिवस परिसरात उत्सवी वातावरण राहणार आहे.

सिरसंगी येथील विजयराव देसाई , अमृतराव देसाई, शंकरराव देसाई यांच्या घरी बाप्पा चे आगमन
सिरसंगी

संबंधित बातम्या

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

तीन दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपणारे सिरसंगीचे विष्णु कुंभार

सिरसंगी प्रतिनिधी गणेशोत्सव म्हटले की भक्ती, उत्साह आणि सजावटीसोबत गणेशमूर्तीला विशेष महत्त्व असते. आकर्षक, सुबक आणि मनमोहक गणेशमूर्ती…

ByByMahadev Kudav Sep 8, 2026

वाटंगी शाळेत देसाई कुटुंबियाकडुन आजोबांच्या ‘बाराव्या’ दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील १०७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक कै. गणपतराव कृष्णा देसाई यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्याचे औचित्य साधून…

ByByMahadev Kudav Sep 4, 2026

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top