सिरसंगी प्रतिनिधी :
सिरसंगी (ता. आजरा) येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन मधुकर येलगार यांच्या हस्ते सभासदांना लाभांश वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक दत्तात्रय देसाई, अमृतराव देसाई, थळबा कांबळे, उपसरपंच पांडुरंग टकेकर, विठ्ठल बुरूड, पांडुरंग देसाई यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव सुभाष चौगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.














