आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • गोकुळच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारण खराब होत आहे – आम. शिवाजीराव पाटील
Image

गोकुळच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारण खराब होत आहे – आम. शिवाजीराव पाटील

कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात विविध राजकीय विषयावर भाष्य

  • गोकुळमधील पराभव मान्य करून पुढे जायला हवे होते .
  • मुशरीफांच्या हट्टाहसामुळेच जिल्ह्याचे राजकारण बिघडत असल्याचा आरोप
    गोकुळ , जिल्हा बँक , साखर कारखाने यहीपेक्षा विविध उद्योग उभारून तरूणाना रोजगार मिळवून देण्याबाबत आश्वासन

सिरसंगी (प्रतिनिधी) :

गोकुळमधील सध्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण खराब होत आहे. गोकुळमध्ये १३ विरुद्ध १२ असा आमचा पराभव झाला असताना तो मान्य करून पुढे जायला हवे होते. मात्र, एका नेत्याने चार सदस्यांची मागणी करण्याचा हट्ट धरला आणि त्याला सरकारनेही दुजोरा दिला. ही बाब मला मान्य नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडत असल्याची टीका आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली.

ते कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गोकुळमधील राजकीय घडामोडींवरही भाष्य केले. गोकुळच्या निवडणुकीत आमच्याच महायुतीतील एका नेत्याने विरोधकांना मॅनेज करून आमच्या पक्षाचा घात केल्याचा आरोपही त्यांनी केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील होते , सूत्रसंचलन अर्जुन पाटील यांनी केले , यावेळी अशोकअण्णा चराठी , आजरा प, स सदस्य समीर पारधे , भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केली , सत्कार समारंभात 2026 ची महालक्ष्मी यात्रा यशस्वी करणेसाठी सहकार्य केलेल्या सर्व देणगीदारांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , यावेळी विठ्ठल देसाई , संभाजी सरदेसाई , विकास बागडी , दशरथ अमृते , सरपंच वंदना सावंत व उपसरपंच दिपली रामचंद्र पाटील , व सर्व ग्रामपंचायत सदस्य , सुभाष सावंत, प्रकाश पाटील अनिकेत चराठी , सिरसंगी सरपंच संदीप चौगुले , संजय गांधी निराधार संमती सदस्य संतोष चौगुले, गणपती पाटील , रमेश बुगडे , जोतीबा बोर , विजय अमृसकर , आनंदा पाटील , दिनकर देसाई , युवराज देसाई यांच्यासह कोळींद्रे पोश्रातवाडी ग्रामस्थ उपस्थित होते ,आभार सुरेश सावंत यांनी मानले .

गडहिंग्लजमधील वक्तव्याचे समर्थन

गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. कृषी अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नगरसेवक सरकारविरोधी घोषणा देत होते. सत्तेत असलेलेच मंत्री हसन मुश्रीफ आपल्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते चुकीचे आहे. त्यामुळेच संबंधित कार्यकरत्याबाबत ते वक्तव्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ निवेदन देऊन किंवा पत्रव्यवहार करून दुष्काळ निधी मिळत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करावा लागतो, असा टोला त्यांनी माजी आमदार राजेश पाटील यांना लगावला.

शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन

शक्तिपीठ महामार्गामुळे आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड परिसरातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. सध्या रोजगारासाठी मुंबई, पुणे आणि गोवा येथे गेलेल्या तरुणांना गावाकडे परतण्याची संधी या महामार्गामुळे निर्माण होईल. या भागाच्या विकासाला आणि रोजगारनिर्मितीला शक्तिपीठ महामार्ग चालना देईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

सिरसंगीचे सी. आर. देसाई यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी : सिरसंगी गावचे सुपुत्र श्री. सी. आर. देसाई सर यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

धामणे येथे ऊस ट्रॉली- दुचाकी अपघातात दोन ठार

मयत संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी            धामणे-बेलेवाडी (ता. आजरा) रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

चुलतीच्या रक्षाविसर्जनदिवशीच मायलेकींचा मृत्यू

कोवाडे ता.आजरा येथील घटना सिरसंगी प्रतिनिधी : कोवाडे (ता. आजरा) येथे चुलतीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच आई आणि मुलीचे निधन…

ByByMahadev Kudav Nov 14, 2026

साता समुद्रापार भारतीयांची दिवाळी साजरी करणारे साटपे कुटुंबीय!

आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे यांचे वेल्स कार्डिफ शहरात आहे ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’…

ByByMahadev Kudav Nov 12, 2026

Leave a Reply
Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top