आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

चुलतीच्या रक्षाविसर्जनदिवशीच मायलेकींचा मृत्यू

कोवाडे ता.आजरा येथील घटना

हिराबाई होडगे -वय ८५ तानुबाई होडगे ९० पार्वती पाटील ६५

सिरसंगी प्रतिनिधी :

कोवाडे (ता. आजरा) येथे चुलतीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच आई आणि मुलीचे निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे होडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोवाडेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोवाडे येथील हिराबाई विठोबा होडंगे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने १० नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. शुक्रवारी (दि. १३) त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम होता. याच दिवशी हिराबाई यांच्या जाऊ तानुबाई दत्तात्रय होडगे (वय ९०) यांचेही निधन झाले. दरम्यान, तानुबाई यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या त्यांची होणेवडी येथील मुलगी पार्वती जानू पाटील (वय ६५) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

एकाच दिवशी मायलेकींचे निधन झाल्याने होडगे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. चुलतीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच मायलेकींचा मृत्यू झाल्याने कोवाडे व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

हिराबाई विठोबा होडगे या भादवण (ता. आजरा) येथील सातेरी पतसंस्थेचे व्यवस्थापक परशराम विठोबा होडगे यांच्या मातोश्री होत. तर तानुबाई दत्तात्रय होडगे या आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी सुभाष दत्तात्रय होडगे यांच्या मातोश्री होत.

संबंधित बातम्या

सिरसंगीचे सी. आर. देसाई यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी : सिरसंगी गावचे सुपुत्र श्री. सी. आर. देसाई सर यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

धामणे येथे ऊस ट्रॉली- दुचाकी अपघातात दोन ठार

मयत संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी            धामणे-बेलेवाडी (ता. आजरा) रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

साता समुद्रापार भारतीयांची दिवाळी साजरी करणारे साटपे कुटुंबीय!

आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे यांचे वेल्स कार्डिफ शहरात आहे ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’…

ByByMahadev Kudav Nov 12, 2026

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अशोकआण्णा चौगले

सिरसंगी गावच्या विकासासाठी योगदान; सामाजिक सलोखा जपण्यात आजही अग्रेसर सिरसंगी : गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या चार…

ByByMahadev Kudav Nov 11, 2026

ब्रेकिंग न्यूज

चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील गोकूळचे चेअरमन गोकुळच्या आध्यक्षपदी अखेर महायुतीचे राजेश पाटील यांची निवड करण्यात आली असून…

ByByMahadev Kudav Nov 10, 2026

गोकुळच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील राजकारण खराब होत आहे – आम. शिवाजीराव पाटील

कोळिंद्रे येथे महालक्ष्मी यात्रेतील देणगीदारांच्या सत्कार समारंभात विविध राजकीय विषयावर भाष्य सिरसंगी (प्रतिनिधी) : गोकुळमधील सध्याच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील…

ByByMahadev Kudav Nov 8, 2026

सिरसंगी श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेकडून ५ टक्के लाभांश वाटप

सिरसंगी प्रतिनिधी : सिरसंगी (ता. आजरा) येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ५ टक्के लाभांश वाटप करण्यात…

ByByMahadev Kudav Nov 5, 2026

……..आता ऊस तोडणी खुशाली ५० रुपये प्रति टनाप्रमाणेच

सिरसंगीकरांचा निर्णय, नियमांचे उल्लंघन केल्यास 2000 रु दंड सिरसंगी प्रतिनिधी : ऊस तोडणी कामगारांना दिल्या जाणाऱ्या खुशालीबाबत सिरसंगी…

ByByMahadev Kudav Nov 4, 2026

गोकुळचे नूतन संचालक माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी :गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारवेळी आजरा…

ByByMahadev Kudav Nov 1, 2026

Leave a Reply
Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top