राजेंद्र गड्यान्नवर यांचे सिरसंगी, वाटंगी किने परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन मंगळवार 27 रोजी नेसरी मोटारसायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन
सिरसंगी : उसाला प्रतिटन 4500 रुपये दर मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्र गड्यान्नवर यांनी सिरसंगी येथे केले.
यावेळी संतोष कांबळे यांनी स्वागत करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊस दराच्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळवण्यासाठी मोटर सायकल रॅलीत सहभागी होण्ायविषयी आवाहन केले . यावेळी स्वाभिमानी संघटनेचे सखाराम केसरकर यांनी प्रास्ताविक केले
स्वाभिमानी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नवर यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी इथेनॅाल दरात वाढ व्हावी व साखरेची आधारभूत किमत वाढवावी अशी मागणी केंद्र शासनाकडे केली आहे , याबबात केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी व कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्याबरोबर बैठका घेतल्या संदर्भात माहिती दिली, मागील आंदोलनात कर्नाटकातील शेतकरी लाख संख्येने उतरल्याचे सांगितले म्हणून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले तरच आपल्या उसाला दर मिळू शकतो , त्यासाठी शेतकऱ्यांनी दि. २७ रोजी नेसरी येथे होणाऱ्या मोटारसायकल रॅलीत सहभागी व्हावे, तसेच सायंकाळी धामणे येथे आयोजित सभेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली. ऊस दराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलनात सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी वसंत दळवी , सुभणा दळवी , केरबा कुंभार , धोंडीबा कुंभार , मारुती कुंभार यांचेहस्ते राजेंद्र गड्यान्नवर यांचा सत्कार करण्यात आला , यावेळी रमेश देसाई , अमृत देसाई, शिवाजी होडंगे , दत्तात्रय देसाई , पांडुरंग टकेकर , थळब कांबळे , बाळू कुंभार , सागर कुंभार , परशराम चौगले , दीपक चौगले , चाळू चौगले , नंदकूमार दळवी यांच्यासह गावातील शेतकरीवर्ग मोट्या संख्येने उपस्थित होता .

















