आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर
Image

प्राथमिक शाळा म्हणजे संस्कार केंद्र: अंजनाताई रेडेकर

सिरसंगी प्रतिनिधी

आपल्या गावातील प्राथमिक शाळा या संस्कार केंद्रे असून त्यांचे जतन व संवर्धन आपण सर्वांनीच केले पाहिजे व ती आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केदारी रेडेकर समूहाच्या प्रमुख श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले. त्या वाटंगी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.
राज्याचे माजी गृहमंत्री व विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती रेडेकर उपस्थित होत्या.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. श्रीमती रेडेकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत प्राथमिक शाळा ह्याच खऱ्या संस्कारांची केंद्रे असून आई-वडिलांनंतर संस्कारांची प्रमुख जबाबदारी ही शिक्षकांवर येते. शिक्षकांनी केलेल्या संस्कारांमुळे समाजाची जडणघडण होत असते; समाजाचा पाया मजबूत होत असतो.
त्यामुळे प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी सर्वांनीच सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू नयेत यासाठी आम्ही शाळा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. सरकारने शिक्षणांना अनेक अशैक्षणिक कामे लावली आहेत. त्याचा परिणाम शाळांच्या गुणवत्तेवर होत असून ही अशैक्षणिक कामे कमी केली पाहिजेत. तसेच शून्य पटाच्या अंगणवाडी शाळेतील स्टाफ प्राथमिक शाळेला जोडल्यास त्याचा फायदा शाळेला होईल. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. इंदुबाई कुंभार होत्या. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते तसेच शिवराज समुहाचे प्रमुख श्री. शिवाजी गिलबिले सर, विठ्ठल भिकले, मधुकर चौगुले, बाळू चौगुले, पर्वता नाईक, देऊळवाडीचे उपसरपंच संजय भाई सावंत, हरिश्चंद्र व्हरकटे, महादेव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. पप्पू उर्फ अर्जुन कसलकर यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
श्रीमती रंजना हसुरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

वाटगी : मुलांना वह्या वाटप करताना श्रीमती अंजनाताई रेडेकर , सामाजिक कार्यकर्ते युवराज पोवार व इतर .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026
1 Comments Text
  • elnLUPXclZEltYTDqvlORwNc says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    RzcYlIUinIDrMZIgeC
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top