सिरसंगी प्रतिनिधी
वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट डिसोझा यांनी दिली. संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते स्वागत चेअरमन राजाराम घेवडे यांनी केले. सचिव श्री. एकनाथ कसलकर यांनी अहवालाचे वाचन केले, तर सूत्रसंचालन विश्वास कांबळे यांनी केले. गणेश चतुर्थीनिमित्त म्हैस दुधासाठी १३ टक्के, तर गाय दुधासाठी १० टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा अल्बर्ट डिसोझा यांनी केली. तसेच संस्थेतील शेअर्सधारक सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे, जिल्हा परिषदेचे डॉ. चौगले व डॉ. कोंडीबा कोकरे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. वासरू संगोपन लाभार्थींना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. चेअरमन कार्यकाळात संस्थेची उत्तमप्रकारे प्रगती केल्याबद्दल प्रभाकर सोनार यांचाही सत्कार करण्यात आला .तसेच संस्थेतील ज्येष्ठ सभासदांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करनारे उत्पादक सौ शीतल मलगोंडे, बाबुराव चौगले , वसंत मलगोंडे, अर्जुन कसलकर , लुईस डिसोझा ,जोसेफ डिसोझा , दयानंद मलगोंडे, गणपती कानडे , उत्तम चौगले यांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी बाबुराव गिलबिले, बाळू तेजम, बाबुराव चौगले, बाळू कानडे, सुरेश नाईक, अक्काताई कुंभार, इंदुबाई घोरपडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार परशराम गिलबिले यांनी मानले.

















