आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

वाटंगी ग्रामस्थांकडून डॉ पाटणे यांना श्रद्धांजली

सिरसंगी प्रतिनिधी

वाटंगी ( ता.आजरा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज मोहन पाटणे ( वय 51) यांचे दुखद निधनाबद्दल वाटंगी ग्रामस्थांनी श्रध्दांजली वाहिली.
रवळनाथ मंदिराच्या सभागृहात गावातील सर्व पक्षीय ज्येष्ठ प्रमुखांच्या उपस्थितीत शोकसभा घेण्यात आली होती.
यावेळी डॉ पाटणे हे 21 वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीच्या माध्यमातून गोरगरीबांची अविरतपणे सेवा करणारे सेवाभावी, वैद्यकीय सेवेतून पंचक्रोशीशी नाळ जोडले गेलेले व्यक्तिमत्व असल्याचे सांगून वाटंगी परिसरात गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून डॉ पाटणे प्रसिद्ध असल्याचे मत लोकप्रतिनिधिनी मनोगतातून व्यक्त केले. सिरसंगी , वाटंगी मोरेवाडी येमेकोंड अगदी तालुक्याच्या वाडीवस्तीवर सर्व सामान्यांसाठी डॉ पाटणे हे देवमाणूस होते. त्यांच्या अकस्मित जाण्यामुळे समाजाची अपरिमीत हानी झाल्याचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी व्यक्त केले.
यावेळी आजरा कारखान्याचे संचालक शिवाजीराव नांदवडेकर, वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ गुरव व सहकारी, अप्पासाहेब कुराडे, बाळु कानडे, भिमराव सुतार, अर्जुन कबीर, आशा स्वयंसेवीका, ग्रामस्थ उपस्थित होते.

वाटंगी येथील शोकसभेत श्रद्धांजलि वाहताना माजी सभापति अल्बर्ट डिसोझा

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026
1 Comments Text
  • 369jllink says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Just stumbled upon 369jllink. Not bad, not bad at all. They’ve got some cool games I haven’t seen before. Gives you something different, you know? Worth a look see 369jllink
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top