आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • शिरसंगीत हत्तीने दोन चारचाकी केल्या ‘चक्काचूर’
Image

शिरसंगीत हत्तीने दोन चारचाकी केल्या ‘चक्काचूर’




महादेव कुडव सिरसंगी

सिरसंगीत हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतशिवारात हैदोस घातलेल्या हत्तीने आता गावाकडे मोर्चा वळवला आहे. शुक्रवारी रात्री 2 वाजता बोलेरो पीक अप व आल्टो गाडीची मोडतोड करून संपूर्ण गाडीचे नुकसान केले आहे. त्यामुळे ग्रामस्थतून भीतीचे वावरण पसरले आहे. शिरसंगी येथील परशराम दत्तू माटले यांची पोल्ट्री पक्षी ने आण करणारी बोलेरो पीकअप ही गाडी गोटणदेव परिसरात उभी होती, सदर गाडी 10 फुट फरफटत नेत गाडीच्या बोनेटवर पाय देऊन पूर्ण चक्काचूर केली आहे. त्यानंतर हत्तीने शेवंता निंगू सावंत यांच्या दारात उभी केलेली पुंडलीक मलगोंडकर यांची आल्टो गाडी दहा फूट फरफटत नेत मोडतोड केली यामध्ये दोन्ही गाडींचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले आहे . त्यानंतर हत्तीने दिलीप पाटील यांच्या दारातील स्प्लेडेर सोंडीने धक्का देऊन पाडली. त्यानंतर हत्तीने गणेश देसाई यांच्या शेतातील गहू पिक खाऊन त्यामध्ये नाचून नुकसान केले .

गुरुवारी रात्री कृष्ण टकेकर यांच्या घोलाकडील शेतातील पत्र्याचे शेड पूर्णपणे मोडतोड केली तर आनंदा टकेकर व शांताराम पाटील यांच्या ऊस लागण केलेल्या शिवारात धुमाकूळ घातला आहे, सि आर देसाई, मनोहर देसाई यांच्या काजू आंबा झाडांची मोडतोड तर पांडुरंग कानडे यांच्या केळीच्या बागेची नासधूस यामुळे हत्तीकडून दररोज लाखों रुपयांचे नुकसान सुरू आहे , वन्य प्राण्याकडून शेतीचे दररोजचे नुकसान व वनविभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेती करावी की पडीत ठेवावी असा प्रश्न शेतकाऱ्यांसामोर पडला आहे, पिकाची राखण करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर आहे . अगदी गावापासून ते जंगल हद्दीपर्यंत शिवारात जागोजागी स्पीकर लावलेले आहेत पण वण्याप्रणि स्पीकरला सुद्धा दाद न देता धडक शिवरातील पिकाचा फडश्या पाडत आहे .

पुंडलीक मलगोंडकर यांच्या पलटी केलेली गाडी
परसू माटले यांची बोलेरो पीकअप गाडीची मोडतोड

संबंधित बातम्या

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

येमेकोंडच्या नम्रता विनायक कातकर याना पीएच .डी

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top