आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • उसाला ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे; मोटारसायकल रॅलीला वाटंगी, किने, सिरसंगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Image

उसाला ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे; मोटारसायकल रॅलीला वाटंगी, किने, सिरसंगीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी  :

राजेंद्र गड्यान्नवर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग; घोषणांनी नेसरी परिसर दणाणला

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५०० रुपये दर मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नवर यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली. फाटणे फाटा ते अडकूर, नेसरी, महागाव, उत्तूर आणि धामणे या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीला वाटंगी, किने आणि सिरसंगी कोळींद्रे परिसरातील    शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वाटंगी येथून शिवराज ग्रुपचे शिवाजी गिलबिले, अप्पासाहेब कुराडे, माजी सरपंच मधुकर जाधव, संतोष बिरजे आणि गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन राजू घेवडे यांच्यासह शेकडो शेतकरी मोटारसायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. किने येथून सखाराम केसरकर आणि अर्जुन तुप्पट यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

सिरसंगी येथून प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच अमृत देसाई, रमेश देसाई, शिवाजी होडगे, माजी उपसरपंच पांडुरंग टकेकर, दत्तात्रय देसाई आणि दीपक चौगले ,सदाशिव परीट, चंद्रकांत देसाई   बाबुराव सडेकर , पांडुरंग देसाई , सागर कुंभार  बाळू कुंभार , नामदेव मयेकर, अमर कांनडे , विजय मयेकर पिरजी कांबळे ,  पांडुरंग कोकितकर, दत्तू देसाई,   यांच्यासह युवा शेतकरी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला.

नेसरी येथे  रॅली आल्यानंतर    शेतकरी संघटनेचे नेते तानाजी पाटील , राजेंद्र गड्यानवर यांनी उपस्थित  शेतकऱ्याना मार्गदर्शन केले, त्यानंतर  प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला राजेंद्र गड्यान्नवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ऊसदराच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या घोषणांनी नेसरी परिसर दणाणून गेला.

धामणे येथे सभा झाल्यानंतर मोटारसायकल रॅलीची सांगता करण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत आपली भूमिका ठामपणे मांडली. या रॅलीत वाटंगी, किने आणि सिरसंगी कोळींद्रे  परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले.

संबंधित बातम्या

सिरसंगीचे सी. आर. देसाई यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी : सिरसंगी गावचे सुपुत्र श्री. सी. आर. देसाई सर यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

धामणे येथे ऊस ट्रॉली- दुचाकी अपघातात दोन ठार

मयत संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी            धामणे-बेलेवाडी (ता. आजरा) रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

चुलतीच्या रक्षाविसर्जनदिवशीच मायलेकींचा मृत्यू

कोवाडे ता.आजरा येथील घटना सिरसंगी प्रतिनिधी : कोवाडे (ता. आजरा) येथे चुलतीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच आई आणि मुलीचे निधन…

ByByMahadev Kudav Nov 14, 2026

साता समुद्रापार भारतीयांची दिवाळी साजरी करणारे साटपे कुटुंबीय!

आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे यांचे वेल्स कार्डिफ शहरात आहे ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’…

ByByMahadev Kudav Nov 12, 2026

Leave a Reply
Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top