आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी मलिग्रे रस्त्याला वन विभागाचाअडसर
Image

सिरसंगी मलिग्रे रस्त्याला वन विभागाचाअडसर

वन विभागाकडून परवानगी कधी मिळणार ?
वन विभागाच्या हद्दीतील चिखलामध्ये दुचाकी , चारचाकी वाहने अडकून बसत आहे.
भडगाव पुल बंदमुळे पर्यायी मार्ग म्हणून या मालिग्रे सिरसंगी रस्त्यावरून वाहतुकीची वर्दळ

सिरसंगी प्रतिनिधी

मलिग्रे सिरसंगी गावांच्या सिमेवर , चाळोबा डोंगराच्या पायथ्याशी वन विभागाची ऐंशी मिटर ची हद असल्याने, गेल्या पंचवीस वर्षांपासून या दोन गावांना जोडणारा रस्ता व्हावा ही दोन्ही गावांतील नागरिक व शेतकरी यांची मागणी होती. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ३.५ किलोमीटर सुपर रस्ता झाला आहे. परंतू वनविभागातील ऐंशी मिटर पैकी दहा फुटात रस्त्यात चिखल झाल्याने गाड्या रूतून मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मलिग्रे कागिनवाडी रस्त्याला जोडणारा नविन मलिग्रे सिरसंगी रस्ता जानेवारी पासून वापरात आल्याने चंदगड तालुक्यात गावांना गडहिंग्लजला जाणारा जवळचा व पर्यायी मार्ग म्हणून वांटगी सिरसंगी सरबंळवाडी हारूळ गजरगाव मार्गे गडहिंग्लज जाणेसाठी या रस्त्यावर खुपचं वाहतूक वाढली आहे . गडहिंग्लज नेसरी रस्त्याचे काम सुरू असल्याने व भडगाव नदी पुलाचा प्रश्न तयार झाल्याने ,या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढल्याने वनविभागातील सिरसंगीकडील रस्त्यावर चिखल झाल्याने लहान वाहनांची कसरत होत आहे. दहा फुटासाठी दहा किलोमीटर चा फेरा करावा लागत आहे. मुळात हा रस्ता वळणावळणाचा कोकणात जाणारा असा वाटावा असा आकर्षक रस्ता तयार केला असुन दिशादर्शक फलक , दोन्ही बाजूंनी पांढरेशुभ्र पट्टे व रेडियम मुळे रस्ता सुंदर झाला आहे पण वनविभागातील ऐंशी मिटर अंतराची परवानगी साठी प्रस्ताव नागपूर पर्यंतचा पाठपुरावा सुरू आहे. तरी पण पर्यायी रस्ता म्हणून किमान खडीकरण करुन रस्ता सुरळीत करावा अशी वाहनधारकाची मागणी आहे.हलकर्णी महागाव आजरा रस्ता काम सुरू असल्याने आजरा पुर्व भागांतील लोकांना मलिग्रे सिरसंगी हा सोयीचा मार्ग असल्याने वनविभागातील दलदलसाठी जनतेने उठाव करणेची गरज आहे.

वनविभागाने लवकर मंजूर द्यावी – नारायण साटपे {गोठणदेव दुध संस्था चेअरमन} सिरसंगी येथील गोठणदेव क वर्ग पर्यटन स्थळांतील दोन एकरावरील वडाचे झाड पहाण्यासाठी या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे त्यासाठी वनविभागाने लवकर मंजूर द्यावी अथवा शासनाने खडीकरण करून वाहतूक सुरळीत करावी .

.

सिरसंगी मलीग्रे रस्ता

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top