आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

हत्तीचा धिंगाणा

सिरसंगी प्रतिनिधी

गेले कित्येक महिन्यापासून वास्तव्यास असलेला हत्तीने आता शेतकऱ्यांच्या शिवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली असून. रचलेल्या गवताच्या गंजी, पाण्याच्या पाईप लाईन , शेततळे केळीच्या बागा, काजूची झाडे, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

काही शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक घेतले आहे तर गावालगत असलेल्या गणेश देसाई व किशोर देसाई यांच्या गव्हाच्या पिकामध्ये हत्तीने धुडगूस घातला आहे यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे, विलास पताडे, किशोर देसाई, सुरेश सावंत, शंकर सावंत यांच्या रचलेल्या गवताच्या व पायानांच्या गंजी हत्तीने विसकूटून टाकले आहेत, तुकाराम मातवणकर यांच्या केळी उद्ध्वस्त केल्या आहेत. यामुळे शेतकरी हातबल झाला असून जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे ‌.

रानटी प्राणी व रान गव्यांच्या राखणीसाठी शेतकरी शिवारात माचळी बांधून राखण करत होते पण हत्ती मुळे गेल्या दोन वर्षापासून रात्रीचे शिवारात जाणे सुद्धा शेतकरी टाळत आहेत त्यामुळे गव्यांचा कळप जंगलातून थेट शेतशिवारात येत असून यामध्ये सुमारे 100 एकर शेत शिवारातील ऊस गव्याच्या कळपाकडून फस्त केला आहे यामुळे भविष्यातील पुढील वर्षी मिळणारे ऊस पिकाचे उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे. यामुळे उत्पन्नात घट होणार असल्याची भीती शेतकर्यानी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top