आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

खोडवा ऊस होतोय फस्त, हत्ती बरोबर फिरतोय गव्यांचा कळप

महादेव कुडव सिरसंगी

सध्या आजरा तालुक्यातील सिरसंगी येथील शेतशिवारात हत्तीने धुमाकूळ घातला असून हत्तीबरोबर गव्यांचा कळप आलेले खोडवा पीक फस्त करत आहे दररोज सुमारे ४ ते ५ एकर शिवारातील ऊसाचे खोडवा पीक गव्यांकडून फस्त होत आहे. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर पडला आहे . गेले दहा दिवस हत्तीकडून शेतात असलेले पाईपलाईन पाण्याची टी चे नुकसान, केळी काजू ची झाडे मूळापासून उपटून टाकत आहे . बुधवारी रात्री सुरेश सावंत यांची रचलेली गवत व पयान गंजी शिवारभर विस्कटली असून त्यांच्या पाईपलाईन ही नुकसान केले आहे दशरथ येलगार यांची गोट्याशेजारी उभी केलेली बैलगाडीचे नुकसान करून उभ्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे . गेले चार दिवस हत्तीबरोबर ३० ते ३५ गव्यांचा कळप फिरत असून उसाचे खोडवा पीक फस्त करत आहेत. गेल्या चार दिवसात चाळू सावंत, लक्ष्मण सावंत, शेवंता सावंत, बाजीराव पाटील यांच्या खोडवा पिक फस्त केले आहे .

हत्तीच्या भीतीपोटी ऊस पिकाचे राखण करणे अवघड झाले आहे. दररोजचे होणारे पिकाचे नुकसान व वनविभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे . वनविभागाने आमची शेतीच भाडेतत्वावर घ्यावी व आमचे पालनपोषण करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .

लक्षमी पाटील यांच्या ऊस पिकाचे नुकसान
सुरेश सावंत यांच्या ऊस खोडवा पिकाचे गव्यांच्या कळपाने केलेले नुकसान
शंकर पाटील यांच्या काजूच्या झाडाचे केलेले नुकसान
चाळू सावंत यांच्या शेतात हत्तीकडुन झालेले नुकसान

संबंधित बातम्या

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

शालेय गायन स्पर्धेत वाटंगी हायस्कूलचे उल्लेखनीय यश

मडिलगे हायस्कूल प्रथम क्रमांक आजरा हायस्कूल द्वितीय पीएम श्री उर्दू प्राथमिक वि.मं . तृतीय क्रमांक सिरसंगी प्रतिनिधी श्रीमंत…

ByByMahadev Kudav Aug 19, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top