आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज
Image

एकादशीनिमित्त गेली 36 वर्ष चहापाणी देणारे येमेकोंडचे ह.भ .प. गणू महाराज

सिरसंगी प्रतिनिधी

गेली 36 वर्षे एकादशीनिमित्त गावातील जमलेल्या गावकऱ्याना चहापाणी देऊन तोंड गोड करणारे गणू भीमा कसेकर हे सिरसंगी येमेकोंड परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहेत . गणू महाराज म्हणून प्रसिद्ध असणारे कसेकर हे आजरा तालुक्यातील येमेकोंड गावचे राहिवाशी आहेत .एकादशी आली की ह. भ. प. गणू महाराजांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी येतेच , आज त्यांचे वय 84 असून देखील रोज सिरसंगी येमेकोंड पायी चालत ये जा करतात . गेल्या 48 वर्षापासून वारकरी सांप्रदायात असलेले गणू महाराज हे दर एकादशी निमित गावातील उपस्थित असलेल्या गावकऱ्याना चहा पाजून तोंड गोड करण्याचे काम करतात . आपल्याला वारकरी संप्रदायात येण्यासाठी वाटंगी येथील कै . गणू गिलबिले यांच्या मार्गदर्शन लाभले असल्याचे कसेकर सांगतात . ही सेवा करण्यासाठी अपली पत्नी इंदुबाई हिचीसुद्धा आपल्याला साथ मिळत असल्याचे ते अभिमानाने सांगतात , दरवर्षी कार्तिक वारी करत असलेले गणू महाराज गेल्या कित्येक वर्षापासून कित्येक आजारावर वनऔषध देण्याचे कांही करतात . कुत्रा चावल्यास, मांजर -उंदीर चावल्यास जनावार आजारी पडल्यास त्यावर वनऔषध देण्याचे कामही कासेकर करतात. सुरुवातीला सिरसंगी येमेकोंड हद्दीतील शेतावर राहत असलेले गणू महाराज आता वयोमानामुळे येमेकोंड गावी राहतात . दर तीन वर्षानंतर गावातील संत मंडळीना एकत्र करून पंचपक्वान जेऊ घालून भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेण्याचे कार्य ते करत असतात. एकादशीनिमित्त चहा देण्याचे कार्य आपण असेच चालू ठेवणार असल्याचे गणू महाराज सांगतात .

सिरसंगी येथील टी स्टालचे मालक एकनाथ मातवणकर यांचे सोबत गणू महाराज कसेकर हे उपस्थिताना चहा पाणी देऊन सेवा करताना .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top