आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

आठवड्यानंतर हत्ती पुन्हा वाटंगीत दाखल

सिरसंगी प्रतिनिधी

गेल्या आठवडाभर कर्नाटक हद्दीत गेलेला हत्ती पुन्हा वाटंगीत दाखल झाला आहे . काल वाटंगितील अनिल रमेश तेजम यांची 3000 लिटर चे सेनटेक्स टाकी व केळीची बागेचे नुकसान व ऊस खोडव्याचे नुकसान केले तर लुईस कुस्तास डिसोझा चे जनावरांच्या गोठयातील जनावरांचा भरडा खाऊन भरड्याचे पोते बाहेर भिरकाऊन दिले. सिरसंगी येथील वसंत सुतार यांच्या ऊसाचे व नारळाचे झाडाचे नुकसान केले आहे. गेले आठवडाभर हत्ती मालिग्रे कोवाडे मार्गे हरळीवरुन कर्नाटक हद्दीत गेला होता . पुन्हा मंगळवारी हडलगे अर्जुनवाडी मार्गे पुन्हा वाटंगीमध्ये दाखल झाला यामुळे हत्ती कायमचा रहिवाशी होतो की काय अशी भीती नगरिकाना पडली आहे. गेल्या सात महिन्यामध्ये सिरसंगी, वाटंगी , येमेकोंड परिसरातील सुमारे 50 ते 60 लाखांचे नुकसान हत्तीकडून झाले आहे. दुचाकी चारचाकी वाहने यांची मोडतोड हत्तीने केली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांच्या शेतशीवारातील पाइप लाईनच्या टी, पाण्याची मोटरचीही मोडतोड केली आहे. यामुळे शेतकरी हैराण झाला आहे .

दिवसा शेतीपंपाची विजमुळे शेतकऱ्यामधून समाधान

ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले सहा सात महिन्यापासून दिवसा वीजपुरवठा सुरू केल्यामुळे शेतकाऱ्यामधून समाधान व्यक्त होत आहे. सद्यस्थितित हत्तीमुळे शेतशीवारात रात्रीचे जाणे धोक्याचे झाले आहे. यामुळे गव्यांचा कळप शेतशीवरात बिनधास्त ऊस फस्त करत आहेत् , हत्तीने जागा सोडली तरच पिके हातात येणार अन्यथा रानटी प्राण्याकडून पिके फस्त होणार त्यामुळे वनविभागाणे हत्ती हटाव मोहीम ही गावकाऱ्याना सहभागी करून राबवणे गरजेचे आहे .

वसंत सुतार यांच्या नारळीचे झाडाचे केलेले नुकसान
अनिल तेजम यांच्या केळीच्या बागेचे नुकसान
वाटंगितील रोमन करवालो यांच्या ऊस पिकांचे गव्यांच्या कळपाकडून झालेले नुकसानीचे पंचनामा करताना वनरक्षक तानाजी कवळीकट्टिकर व तानाजी खांडेकर

संबंधित बातम्या

आजरा साखर कारखान्यामार्फत सिरसंगी व किणे येथे साखर वाटप

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी व किणे येथे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या मार्फत सभासदांना व ऊस उत्पादकांना देण्यात येणाऱ्या…

ByByMahadev Kudav Apr 18, 2026

पाच महिन्यांपासून रजेवर असणाऱ्या शिक्षिकेच्या बदलीची मागणी

सिरसंगी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीने दिली तक्रार किणे वार्ताहरआजरा तालुक्यातील सिरसंगी केंद्रशाळेत रुजू झालेपासून एकही दिवस अध्यापन न…

ByByMahadev Kudav Apr 18, 2026

आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी केंद्र शाळेचे आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचा शिक्षक व शालेय कमिटी सदस्यांकडून सत्कार करण्यात आला.स्व.…

ByByMahadev Kudav Apr 17, 2026

सिरसंगीत संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी

संत गोरोबाकाका उत्साहात साजरीशिरसंगी येथे संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात…

ByByMahadev Kudav Apr 16, 2026

सिरसंगीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे भीमराव युवा मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

ByByMahadev Kudav Apr 14, 2026

उत्तम कोकीतकर याना “स्व. अनंतराव आजगावकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सिरसंगी प्रतिनिधी आंतरभारती परिवार व उत्तूर ग्रामस्थ, उत्तूर यांच्या वतीने स्व. अनंतराव आजगावकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त “स्व.…

ByByMahadev Kudav Apr 14, 2026

हंदेवाडीचे नायब सुभेदार श्रीधर मारुती लोहार यांचा सत्कार

जि प सदस्य सुधीर देसाई , सुनील शिंत्रे यांच्या हस्ते सत्कार सिरसंगी प्रतिनिधी हंदेवाडी येथील सैनिकाचा गौरव सोहळा:-…

ByByMahadev Kudav Apr 13, 2026

मडिलगे जवळील अपघातात तिघे जखमी

     चारचाकी व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील तिघे जखमी झाले आहेत.मनोज दत्तात्रय बोरकर (वय…

ByByMahadev Kudav Apr 12, 2026

सिरसंगीत आज विराट हिंदू संमेलन

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगीत आज शनिवार दि 11 एप्रिल रोजी सायंकाळी ते रात्री 9.30 वाजता सकल हिंदू समाजातर्फे विराट…

ByByMahadev Kudav Apr 11, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top