आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

हत्तीचा धिंगाणा

सिरसंगी प्रतिनिधी

गेले कित्येक महिन्यापासून वास्तव्यास असलेला हत्तीने आता शेतकऱ्यांच्या शिवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली असून. रचलेल्या गवताच्या गंजी, पाण्याच्या पाईप लाईन , शेततळे केळीच्या बागा, काजूची झाडे, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

काही शेतकऱ्यांनी गव्हाचे पीक घेतले आहे तर गावालगत असलेल्या गणेश देसाईकिशोर देसाई यांच्या गव्हाच्या पिकामध्ये हत्तीने धुडगूस घातला आहे यामध्ये हजारो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे, विलास पताडे, किशोर देसाई, सुरेश सावंत, शंकर सावंत यांच्या रचलेल्या गवताच्या व पायानांच्या गंजी हत्तीने विसकूटून टाकले आहेत, तुकाराम मातवणकर यांच्या केळी उद्ध्वस्त केल्या आहेत. यामुळे शेतकरी हातबल झाला असून जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे ‌.

रानटी प्राणी व रान गव्यांच्या राखणीसाठी शेतकरी शिवारात माचळी बांधून राखण करत होते पण हत्ती मुळे गेल्या दोन वर्षापासून रात्रीचे शिवारात जाणे सुद्धा शेतकरी टाळत आहेत त्यामुळे गव्यांचा कळप जंगलातून थेट शेतशिवारात येत असून यामध्ये सुमारे 100 एकर शेत शिवारातील ऊस गव्याच्या कळपाकडून फस्त केला आहे यामुळे भविष्यातील पुढील वर्षी मिळणारे ऊस पिकाचे उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे. यामुळे उत्पन्नात घट होणार असल्याची भीती शेतकर्यानी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

आजऱ्यात घरफोडी – 15 तोळे सोने चांदीच्या दागिनेसह मोटर सायकलही केली लंपास

दोन घरात सोने चांदीवर मारला डल्ला तर जाताना माध्यमिक शिक्षकाची मोटरसायकलही केली लंपास सिरसंगी प्रतिनिधी आजरा येथे शिवकॉलनी…

ByByMahadev Kudav Jun 21, 2026

सिरसंगी केंद्र शाळा व आदर्श हायस्कूलमध्ये योगदिन उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला , यामध्ये शाळेचे मुख्याद्यापक शिवाजी बोलके ,…

ByByMahadev Kudav Jun 21, 2026

वि मं. पोश्रातवाडी शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडीतून

सिरसंगी प्रतिनिधी पोश्रातवाडी येथील वि मं . शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडी व वाद्यवृंदाच्या साथीने गावातून मिरवणूक काढून करण्यात…

ByByMahadev Kudav Jun 17, 2026

हडलगे येथील प्राचार्य संजय कालकुंद्रीकर यांचा सेवानिवृत्तीनिमित गौरव

सिरसंगी प्रतिनिधी हडलगे तालुका गडहिंग्लज येथील सुपुत्र व एस.एस.हायस्कूल छ.शिवाजी ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य संजय जानबा कालकुंद्रीकर यांचा…

ByByMahadev Kudav Jun 3, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top