आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगी केंद्रशाळेत नवागतांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणुकीने स्वागत
Image

सिरसंगी केंद्रशाळेत नवागतांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणुकीने स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी

शिरसंगी केंद्र शाळेत नवीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत श्री रवळनाथचे दर्शन घेऊन सर्व विद्यार्थ्यांना ट्रॅक्टर व ट्रॉली बसवून वाद्यवृंदाच्या साथीने विद्यार्थ्यांचे गावातून मिरवणूक काढून इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये दाखल करण्यात आले. या मिरवणुकीत गावातील सर्व नागरिकांनी सहभागी दर्शवला होता. सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन कमिटीच्या उपाध्यक्षा सौ प्रतीक्षा चौगुले, सदस्यां सुप्रिया उत्तम कुंभार सुप्रिया सागर कुंभार यांनी औक्षण केले. यावेळी शासनामार्फत मिळालेली पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या पेन्सिल वाटप करण्यात आली . विशाल भीमराव सडेकर यांचेतर्फे वह्या पेन्सिल वाटप करण्यात आले सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागतगीताने स्वागत केले. उत्तम कोकितकर सर यांनी प्रास्ताविक करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी प्राचार्य सि आर देसाई उपस्थित होते. यावेळी सि आर देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिकाल तरच टिकाल असा संदेश देऊन चांगले शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे व आपले नाव उज्वल करुन एक सुजाण नागरिक बना असे समुपदेशन केले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी बोलके यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी लक्ष्मण कुंभार सुप्रिया पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केले. यावेळी महादेव कुडव भीमराव सडेकर विजय मयेकर उपस्थित होते . संतराम केसरकर यांनी आभार मानले

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026
1 Comments Text
  • apuestascolbet says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    I have tried quite a few sites over the years but the attention to detail here stands out immediately. The promotions actually match the way local fans enjoy the sport and the dashboard stays clutter free even during peak hours. I received a welcome bonus that felt completely genuine with no hidden traps. It is nice to find a space that respects the culture. apuestascolbet
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top