दोन घरात सोने चांदीवर मारला डल्ला तर जाताना माध्यमिक शिक्षकाची मोटरसायकलही केली लंपास
सिरसंगी प्रतिनिधी
आजरा येथे शिवकॉलनी गांधीनगर परिसरात शनिवारी रात्री घरफोडी झाली. यामध्ये चोरटयानी सोने चांदी दागिन्यांसह मोटरसायकलवरही डल्ला मारला असून यामध्ये सुमारे 14 लाख 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आजरा पोलिस ठाण्यातून मिळाली आहे . आजरा येथील सेवानिवृत्त प्रा. डॉ .नवनाथ शिंदे यांचे घरातून 15 तोळे 6 ग्रामचे सोन्याचे दागिने व 17 तोळे 5 ग्राम चे चांदीचे दागिने व 20000 रुपये रोख रक्कम चोरीस गेली तर शेजारी राहणारे युवराज जाधव यांचे घरातील 9.5 ग्राम सोने व 3 तोळे चांदीचे दागिने तर माध्यमिक शिक्षक संजय यशवंत भोये यांची होंडा शाईन मोटरसायकल MH 15 HR1597 ही अज्ञात चोरटयानी चोरी केल्याची तक्रार आजरा पोलिस ठाण्यात नोंद केली आहे . पुढील तपास आजरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत .














