आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीचे सी. आर. देसाई यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
Image

सिरसंगीचे सी. आर. देसाई यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी

: सिरसंगी गावचे सुपुत्र श्री. सी. आर. देसाई सर यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सिरसंगी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्राहकांचे हक्क, ग्राहकांचे हित आणि ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देसाई सर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिरसंगी गावासह आजरा तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सिरसंगी गावचे नाव जिल्हास्तरावर उंचावणाऱ्या सी. आर. देसाई सर यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

संबंधित बातम्या

धामणे येथे ऊस ट्रॉली- दुचाकी अपघातात दोन ठार

मयत संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी            धामणे-बेलेवाडी (ता. आजरा) रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

चुलतीच्या रक्षाविसर्जनदिवशीच मायलेकींचा मृत्यू

कोवाडे ता.आजरा येथील घटना सिरसंगी प्रतिनिधी : कोवाडे (ता. आजरा) येथे चुलतीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच आई आणि मुलीचे निधन…

ByByMahadev Kudav Nov 14, 2026

साता समुद्रापार भारतीयांची दिवाळी साजरी करणारे साटपे कुटुंबीय!

आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे यांचे वेल्स कार्डिफ शहरात आहे ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’…

ByByMahadev Kudav Nov 12, 2026

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व अशोकआण्णा चौगले

सिरसंगी गावच्या विकासासाठी योगदान; सामाजिक सलोखा जपण्यात आजही अग्रेसर सिरसंगी : गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या चार…

ByByMahadev Kudav Nov 11, 2026

Leave a Reply
Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top