मयत संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी
धामणे-बेलेवाडी (ता. आजरा) रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली मागे येत मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.दोघेही सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. ट्रॅक्टरचालक फरार आहे
महादेव दिनकर करवळ (वय ४९, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड) आणि बचाराम शिवाजी सुतार (वय ६५, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) हे दोघे मोटरसायकल वरुन कारखान्याकडे जात होते.त्यांच्या समोर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. KA-23-TC-7048) ट्रॉलीसह जात होता. अचानक ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली वेगाने मागे येऊन दुचाकीला धडकली. ट्रॉली अंगावरून गेल्याने दोघांचाही मृत्यू झाला.अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












