आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • ……..आता ऊस तोडणी खुशाली ५० रुपये प्रति टनाप्रमाणेच
Image

……..आता ऊस तोडणी खुशाली ५० रुपये प्रति टनाप्रमाणेच

सिरसंगीकरांचा निर्णय, नियमांचे उल्लंघन केल्यास 2000 रु दंड

सिरसंगी प्रतिनिधी :

ऊस तोडणी कामगारांना दिल्या जाणाऱ्या खुशालीबाबत सिरसंगी येथील ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिरसंगी येथील महादेव मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत कारखाना सुरू झाल्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत ऊस तोडणी कामगारांना ५० रुपये प्रतिटन याप्रमाणेच खुशाली देण्याचे ठरविण्यात आले. तर १ जानेवारी २०२७ पासून कारखाना बंद होईपर्यंत ७५ रुपये प्रतिटन खुशाली देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत ठरविलेल्या नियमानुसार ऊस तोडणी कामगारांना सकाळी केवळ चहा देण्यात येणार असून, अन्य कोणतेही आमिष किंवा अतिरिक्त सुविधा देण्यात येणार नाही. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना जेवणाचा डबा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऊस उत्पादक व वाहतूकदारांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयासंदर्भातील सूचना फलक सिरसंगी बसस्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. बैटकीमध्ये 25 जणांची कमिटी ठरवण्यात आली आहे .

दरम्यान, गेल्या कित्येक वर्षापासून सुरुवातीला एका ऊस लोडमागे ५०० रुपये खुशाली घेणारे काही ऊस तोडणी मजूर हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत खुशालीची मागणी करतात. यामुळे सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडत असून, त्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

सिरसंगीचे सी. आर. देसाई यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सिरसंगी प्रतिनिधी : सिरसंगी गावचे सुपुत्र श्री. सी. आर. देसाई सर यांची ग्राहक कल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

धामणे येथे ऊस ट्रॉली- दुचाकी अपघातात दोन ठार

मयत संताजी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी            धामणे-बेलेवाडी (ता. आजरा) रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटल्याने ट्रॉली…

ByByMahadev Kudav Nov 20, 2026

चुलतीच्या रक्षाविसर्जनदिवशीच मायलेकींचा मृत्यू

कोवाडे ता.आजरा येथील घटना सिरसंगी प्रतिनिधी : कोवाडे (ता. आजरा) येथे चुलतीच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशीच आई आणि मुलीचे निधन…

ByByMahadev Kudav Nov 14, 2026

साता समुद्रापार भारतीयांची दिवाळी साजरी करणारे साटपे कुटुंबीय!

आजरा तालुक्यातील सिरसंगी गावचे सुपुत्र मारुती शंकर साटपे यांचे वेल्स कार्डिफ शहरात आहे ‘मारुती इंडियन रेस्टॉरंट अँड ग्रोसरी’…

ByByMahadev Kudav Nov 12, 2026

Leave a Reply
Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top