आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा
Image

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती

सिरसंगी प्रतिनिधी
वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेला आर्थिक वर्षात १२ लाख ३७ हजार ३७ रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांनी दिली. तसेच सभासदांना १२ टक्के प्रमाणे लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेत संस्थेच्या आर्थिक अहवालाचे वाचन करण्यात आले. संस्थेकडे ६ कोटी ३५ लाख १६ हजार ९६३ रुपयांच्या ठेवी असून, ४ कोटी ४० लाख ७५ हजार ८०८ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेची ३ कोटी २० लाख ५१ हजार ६५१ रुपयांची गुंतवणूक असून, वार्षिक उलाढाल १४ कोटी २४ लाख २३ हजार ९०४ रुपये असल्याची माहिती देण्यात आली. अहवालाचे वाचन व्यवस्थापक गंगाराम कोकरे यांनी केले.

संस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून ५०० रुपये ठेव ठेवण्यांचा उपक्रम संस्थेने सुरू केला आहे. दरवर्षी दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा सामाजिक उपक्रमही संस्थेमार्फत राबविला जात असल्याची माहिती यावेळी नांदवडेकर यांनी दिली. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी व्हा. चेअरमन सूर्यकांत गाइंगडे, वसंत देसाई, उत्तम कुंभार, पांडुरंग बोर, पांडुरंग गिलबिले, चंद्रकांत नांदवडेकर, संतोष शिंदे, अर्जुन कबीर, प्रकाश जाधव, बाळू नाईक, सौ .मीनाक्षी देसाई, राजाराम थोरवत, केरबा कुंभार, विष्णू कुंदेकर, गोविंद कानडे, अंकुश सुतार, पांडुरंग पोवार, बस्त्याव डिक्रुझ, अर्जुन सावंत, निवृत्ती मुसळे, रामचंद्र दळवी, मिंगेल डायस, बाबुराव कसलकर, शिवाजी कांबळे, युवराज चौगले, महादेव सोनार सौ सुनंदा खुळे , रमेश धडाम सुबराव सुतार दिलीप पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार कार्यकारी अधिकारी रफीक आगा यांनी मानले.

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

तीन दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपणारे सिरसंगीचे विष्णु कुंभार

सिरसंगी प्रतिनिधी गणेशोत्सव म्हटले की भक्ती, उत्साह आणि सजावटीसोबत गणेशमूर्तीला विशेष महत्त्व असते. आकर्षक, सुबक आणि मनमोहक गणेशमूर्ती…

ByByMahadev Kudav Sep 8, 2026

वाटंगी शाळेत देसाई कुटुंबियाकडुन आजोबांच्या ‘बाराव्या’ दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील १०७ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक कै. गणपतराव कृष्णा देसाई यांच्या बाराव्या दिवसाच्या कार्याचे औचित्य साधून…

ByByMahadev Kudav Sep 4, 2026

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top