आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • विशेष
  • सोमवारी रामतीर्थ व चाळोबा ची यात्रा
Image

सोमवारी रामतीर्थ व चाळोबा ची यात्रा

सिरसंगी प्रतिनिधी

सोमवार रामतीर्थ व चाळोबा ची यात्रा होणार असून आजरा रामतीर्थवर रविवार पासूनच महाशिवरात्री निमित्त भाविक दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत . तर सिरसंगी मलिग्रे वाटंगी येमेकोंड परिसरातील महादेव मंदिर, रामलिंग मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार दि १६ रोजी सिरसंगी मलिग्रे हद्दीतील पठारावर वसलेले चांळोबा देवाची यात्रा भरणार असून दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते. या यात्रेला सरंबळवाडी, मलिग्रे, कागिनवाडी, सिरसंगी येमेकोंड येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

आजरा रामतीर्थवर दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी यात्रेत सहभागी होतात . यंदाही महाशिवरात्री रविवारी आल्याने गर्दी होणार असून यात्रेसाठी आजरा आगाराकडून ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत .
सिरसंगी मलिग्रे रस्त्यामुळे यंदा चाळोबा यात्रेला गर्दी वाढणार
यावर्षी सिरसंगी मलिग्रे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढणार आहे.
दरवर्षी परिसरातील भाविक बैलगाडी जुंपून काही ट्रॅक्टर ट्रॉली द्वारे या यात्रेला हजेरी लावतात. यंदा रस्त्याची सोय झाल्यामुळे दुचाकी , चार चाकी वाहने यात्रेच्या ठिकाणापर्यंत पोहोचणार असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top