
सिरसंगी : गेली दोन तप (२४ वर्षे) अखंड पायी वारी करत पंढरपूरची यात्रा करणारे हभप अनंत विठ्ठल सुतार यांचा सिरसंगी येथील माऊली भजनी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
याचवेळी माऊली भजनी मंडळाला सौ. व श्री. अशोक येलगार तसेच मुंबई पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील यांनी देणगी स्वरूपात वीणा व टाळ भेट दिले. त्यांच्या या भक्तीभावपूर्ण योगदानाबद्दल मंडळातर्फे त्यांचाही सत्कार करण्यात आला. अनंत सुतार यांनी शृंगारवाडी येथील हरिपाठ महिला भजनी मंडळाचे मार्गदर्शक गुरु राहिले आहेत त्याचबरोबर गावामध्ये त्यांनी महादेव बाल भजनी मंडळ तयार केले असून युवकानी वाईट सवयीच्या अधीन होण्यापेक्षा आध्यात्मिककडे वळावे यासाठी सुतार नेहमीच प्रयत्न करीत असतात तीनच्या या कार्याची पोहोचपावती म्हणून मंडळाकडून सत्कार करण्यात आला . या सत्कारप्रसंगी विठ्ठल बुरूड, विठ्ठल मातवणकर, माजी उपसरपंच वसंत सुतार, संतोष सुतार, गणेश मातवणकर, विकास होडंगे , सुभाणा दळवी , दशरथ कुडव , बाळू पाटील , सुधाकर होडंगे आनंदा बुडके , शिवाजी होडंगे , तुकाराम मातवणकर , पांडुरंग कोकितकर , कृष्णा पाटील रेणुका बुरूड सुशील परीट धोंडूबाई होडंगे , केरबा सुतार अनिल मुळीक आदी उपस्थित होते.














