आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे
Image

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी


सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व त्यांच्या पत्नी रूपाली सुतार हे दाम्पत्य गेल्या 15  वर्षांपासून गणेशमूर्ती निर्मितीचा व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा १२ वर्षीय मुलगा स्वयं यालाही गणेशमूर्ती बनविणे, रंगकाम करणे यासह विविध कामांची आवड निर्माण झाली असून तो आपल्या आई-वडिलांना या व्यवसायात मदत करत आहे. यामुळे आता ही कला सुतार कुटुंबियाची चौथी पिढी वारसा चालवत आहे .

दशरथ अनंत सुतार यांचे आजोबा विठ्ठल सुतार हे पारंपरिक पद्धतीने मातीच्या गणेशमूर्ती बनवत होते. विठ्ठल सुतार याना तीन मुलगे सर्वात थोरले वेदमूर्ति बाळासाहेब सुतार हे संस्कृतचा अभ्यास करून पूजा -पाठचे काम करतात तर विठ्ठल सुतार यांचे दोन मुलगे पांडुरंग सुतार व अनंत सुतार यांनी गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा पुढे चालविला. पांडुरंग सुतार आजही मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचे काम करतात. तर अनंत सुतार यांचे चिरंजीव दशरथ सुतार यांनीही लहानपणापासूनच या कलेची आवड जोपासत गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायात प्रवेश केला.

दशरथ सुतार यांचा मूळ व्यवसाय फॅब्रिकेशनचा असला तरी गणेशमूर्ती बनविण्याची असलेली आवड त्यांना या व्यवसायाकडे घेऊन आली. गेल्या दोन दशकांपासून ते गणेशमूर्ती बनविण्याचे काम करत असून, त्यांच्या पत्नी रूपाली सुतार यांचीही त्यांना मोलाची साथ मिळते. त्यांचा मुलगा स्वयं हा देखील मातीपासून मूर्ती बनविणे, मूर्तींना रंग देणे आणि रंगरंगोटीची इतर कामे शिकत आहे.

गणेशोत्सवाची आवड असलेल्या बालचमूंचाही या कामात सहभाग असतो. मूर्तींवर रंगरंगोटी करण्यासाठी येणाऱ्या मुलांना दशरथ व रूपाली सुतार मार्गदर्शन करून या कलेचे प्रशिक्षण देतात. त्यामुळे गणेशमूर्ती निर्मितीची ही पारंपरिक कला पुढील पिढीकडेही हस्तांतरित होत आहे.

सध्या सुतार कुटुंबाने बनविलेल्या गणेशमूर्तींना गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी, शेंद्री, चंदगड तालुक्यातील हलकर्णी तसेच राधानगरी तालुक्यातील खिंडी -वरवडे, भोगावती व पुंगाव परिसरातून मागणी आहे. याशिवाय सिरसंगी, येमेकोंड, किने, चाळोबावाडी आणि दाभिल परिसरातही त्यांच्या मूर्ती दिल्या जातात.

गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला जून महिन्यापासून सुरुवात केली जाते, तर ऑगस्ट महिन्यापासून मूर्तींच्या रंगकामाला सुरुवात होते. सध्या रंगांच्या दरात वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतीतही वाढ झाली असल्याचे दशरथ सुतार यांनी सांगितले. त्यांच्या कार्यशाळेत सव्वा फुटापासून आठ फुटांपर्यंत विविध आकारांच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी लागणाऱ्या मोठ्या मूर्ती कोल्हापूर येथून आणल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशमूर्ती निर्मितीच्या या प्रवासात आई बेबिताई सुतार, वडील अनंत सुतार, पत्नी रूपाली सुतार, मुलगा स्वयं आणि मुलगी श्रेणिका यांचे मोलाचे योगदान असल्याचे दशरथ सुतार यांनी सांगितले. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देत सुतार कुटुंबाने जपलेला हा वारसा ग्रामीण भागातील गणेशमूर्ती कलेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

मूर्तीवर रंगकाम करताना दशरथ सुतार

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top