आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • तीन दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपणारे सिरसंगीचे विष्णु कुंभार
Image

तीन दशकांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपणारे सिरसंगीचे विष्णु कुंभार

सिरसंगी प्रतिनिधी
गणेशोत्सव म्हटले की भक्ती, उत्साह आणि सजावटीसोबत गणेशमूर्तीला विशेष महत्त्व असते. आकर्षक, सुबक आणि मनमोहक गणेशमूर्ती घडविण्याच्या कलेत सिरसंगी (ता. आजरा) येथील विष्णु जोतिबा कुंभार यांनी गेल्या चार दशकांपासून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.विष्णु कुंभार हे मागील सुमारे 35 वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करत आहेत. पारंपरिक पद्धतीने मूर्ती घडविण्याची कला त्यांनी जपली असून, दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हातून विविध आकारांच्या आणि आकर्षक रूपातील गणेशमूर्ती साकारल्या जातात. कांही मूर्ती ते कोल्हापूर येथून आणतात तर कांही घरी बनवतात या कलेत त्यांना त्यांचा मुलगा संजय विष्णु कुंभार यांचीही मोलाची साथ मिळते. संजय कुंभार हे गोवा येथे एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते दरवर्षी गणेश चतुर्थीच्या सुमारे १५ दिवस आधी गावाकडे येतात आणि वडिलांना गणेशमूर्तींच्या रंगकामात मदत करतात.मूर्ती घडविण्यापासून ते तिच्या अंतिम रंगकामापर्यंतची प्रत्येक प्रक्रिया अत्यंत बारकाईने केली जाते. गणेशमूर्तीला आकर्षक रूप देण्यासाठी रंगसंगती, डोळ्यांची रचना, मुकुट, दागिने तसेच विविध अलंकार याकडे विशेष लक्ष दिले जाते. वडिलांकडून आलेली ही कला पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम संजय कुंभार करत आहेत. नोकरीसाठी गोव्यात असूनही गणेशोत्सवाच्या काळात गावाकडे येऊन वडिलांना मदत करण्याची त्यांची परंपरा विशेष कौतुकास्पद आहे. आधुनिक युगात पारंपरिक कला आणि कौटुंबिक व्यवसायापासून अनेक जण दूर जात असताना कुंभार कुटुंबाने मात्र गणेशमूर्ती निर्मितीची परंपरा जपली आहे. सिरसंगी गावातील ही बाप-लेकाची जोडी केवळ गणेशमूर्ती तयार करत नाही, तर कलेसोबतच परंपरा, संस्कृती आणि गावाशी असलेले नातेही जपण्याचे काम करत आहे. सध्या त्यांचेकडे किने , सोनारवाडी या गावातूनही मूर्तीची मागणी आहे . त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात विष्णु कुंभार आणि संजय कुंभार यांची मेहनत भक्तांच्या गणरायाला अधिक सुंदर रूप देत आहे.

रंगांच्या वाढत्या दरामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या दरात गेल्या काही काळात वाढ झाली आहे. विशेषतः मूर्ती रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम गणेशमूर्तींच्या अंतिम किमतीवर झाला आहे. याशिवाय मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य, सजावटीचे साहित्य तसेच वाहतूक खर्चातही वाढ झाल्याने मूर्ती तयार करण्याचा एकूण खर्च वाढत असल्याचे मूर्तिकार विष्णु कुंभार यांनी सांगितले.विष्णु कुंभार सांगतात की, पूर्वीच्या तुलनेत सध्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मूर्ती तयार झाल्यानंतर तिला आकर्षक आणि उठावदार स्वरूप देण्यासाठी विविध प्रकारचे रंग वापरले जातात. गणेशमूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळे, मुकुट, वस्त्र तसेच इतर बारकावे रंगकामातून अधिक खुलून दिसतात. त्यामुळे रंगकाम हा मूर्ती निर्मितीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
रंगांच्या दरवाढीमुळे मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढत असला तरी भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून मूर्तींच्या किमतीत अनावश्यक वाढ न करण्याचा प्रयत्न केला जातो, असे विष्णु कुंभार यांनी सांगितले. मात्र साहित्याच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा काही प्रमाणात भार ग्राहकांवर पडणे अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेश मूर्तींचे रंगकाम करताना संजय कुंभार
सुट्टी दिवशी आजोबांना रंग कामात मदत करण्यासाठी आलेले विष्णु कुंभार यांचे नातू

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top