आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • शिरसंगी येथे श्री माऊली महिला हरिपाठ मंडळ सडेकर ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात
Image

शिरसंगी येथे श्री माऊली महिला हरिपाठ मंडळ सडेकर ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी
आजरा तालुका शिरसंगी येथे माऊली हरिपाठ भजनी मंडळ तर्फे गुरु पौर्णिमा उत्सव साजरी करण्यात आली. यावेळी महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष हभप भिमराव सडेकर यांचे पद्यपुजन करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पखवाजवादक हभप अरुण जाधव महाराज यांचाही मंडळातर्फे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प.अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हरिपाठ म्हणजे जगण्याचा अर्थ हरीपाठामध्ये 27 अभंग असून हे अभंगच आयुष्यातील सात रस आहेत. या प्रत्येक अभंगातून आपल्याला जगण्याचे धडे मिळतात असे यांनी सांगितले. आपल्या हरिपाठ महिला ग्रुपला आजरा तालुक्यातूनच नव्हे तर कोल्हापूर जिल्हा, कर्नाटक, बेळगाव, कोकण याठिकाणी प्रसिद्धी मिळाली असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर आपल्या गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर अखंडपणे सेवा करत राहण्याचा सल्लाही जाधव यांनी दिला.
यावेळी ह भ प भीमराव सडेकर यांनी पुरुषांच्या बरोबरीने अगदी लयबद्धरित्या हरिपाठ या महिलाही करु शकतात हे आमच्या माऊली महिला हरिपाठ मंडळाने दाखवल्याचे सांगून तुमच्या या ग्रुप मुळे मला आज गुरुचे स्थान मिळाल्याचे सांगितले. यावेळी सडेकर यांनी आषाढी वारीतील आपले पायवारी करत असतानाचे अनुभव कथन केले , यावेळी आयुष्यामध्ये कसं जगायचं, कसं वागायचं, कसं आनंद मिळवायचा या तीन गोष्टी या वारीमध्ये शिकायला मिळाल्याचे सडेकर यांनी सांगतल्या. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी आषाढीवारी करा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी ह भ प बंडू कुंभार, ह भ प मारुती कुंभार त्यांचे हस्ते भीमराव साडेकर व अरुण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माऊली हरिपाठ महिला मंडळातील सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top