सिरसंगी प्रतिनिधी
सिरसंगी येथे गुरुवारी रात्री हत्तीने जनावरांच्या गोट्याशेजारी उभी केलेली मोटरसायकल भिरकावून देऊन मोडतोड केली . त्याचबरोबर दरात उभी असलेली बैलगाडीचीही मोडतोड करून नुकसान केले आहे . हत्तीच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यामधून भीतीचे वातावरण पसरले आहे . कांही दिवसापूर्वी हत्तीने शेतकऱ्यांच्या नदी काठी असलेल्या पाण्याच्या मोटरी नदीत फेकल्या असून रात्री गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासमोरच हत्तीने धुमाकूळ घातला होता . जंगलालगत शेतशीवरात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने आता गावा लगत असलेल्या नदीमध्ये मनसोक्त डुबकी घेत आहे पण त्याचबरोबर गावाशेजारी उभ्या केलेल्या दुचाकी चारचाकी वाहनाची मोडतोड करत आहे , नदीकाठी शेतकऱ्यांनि बसवलेल्या पाण्याच्या मोटरी केबल, पाइप लाइन सह नदीत फेकून देत आहे . यामुळे शेतकऱ्यासमोर शेती करायची कशी आस प्रश्न भेडसावत आहे . सिरसंगी येथील सुभाष चौगले यांच्या दोन 7.5 एचपी मोटर तर मारुती कुंभार यांची 5 एचपी मोटर केबलसह नदीमध्ये फेकून दिल्या त्यामधील दोन मोटर शोधून काढण्यात आल्या . कल रात्री हत्तीने दशरथ मारुती येलगार यांची दुचकीची मोडतोड केली यामुळे हत्तीच्या दररोजच्या त्रासापुढे शेतकरी हतबल झाला आहे .
















