आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

वनविभागाला चकवा देत ‘गणेश’ पुन्हा सिरसंगीत दाखल

सिरसंगी प्रतिनिधी

गेल्या चार दिवसापासून वनविभागाने सिरसंगीत गणेश हत्ती हुसकावून लावण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यासाठी गेले चार दिवसात हत्तीला किणे, चाळोबावाडी अर्जुनवाडी, तळेवाडीपर्यंत पिटाळण्यात यश आले होते. . हत्ती अडकूर राजगोळी मार्गे कर्नाटकात जाईल असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला होता. पण वन विभागाचा अंदाज फोल ठरवत हत्ती पुन्हा सिरसंगीच्या जंगलात दाखल झाला आहे.
यामुळे शिरसंगी येमेकोंड नागरिकांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी हत्तीने उग्ररूप धारण करून शिरसंगी गावात प्रवेश करून दुचाकी चार चाकी वाहनांची मोडतोड केली होती त्याचबरोबर नदीकाठच्या पाण्याच्या मोटर, शेत शिवारातील पत्र्यांचे शेड काजूची झाडे यांची नासधूस केली होती. शिरसंगी चे माजी सरपंच सुभाषराव देसाई यांनी माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे हत्तीचा बंदोबस्त संदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मा.हसन मुश्रीफांनी कोल्हापूर वनविभाग चे अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वन विभागाने गेले चार दिवस दिवस रात्र अथक प्रयत्न केले होते. पण हत्तीने वन विभागाचे प्रयत्न हाणून पाडले.
सोमवारी रात्री हत्तीने सिरसंगी हद्दीत प्रवेश करून शेत शिवारातील प्रकाश देशपांडे यांच्या शेतातील पाईपलाईनच्या टी व पाण्याचे प्लास्टिक ड्रम ची मोडतोड करून नुकसान केले आहे.
वन विभागाने त्वरित हत्ती हटाव मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top