आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • येमेकोंड ग्रामस्थांनी चालकासह ब्लास्टिंग गाडी आडवली
Image

येमेकोंड ग्रामस्थांनी चालकासह ब्लास्टिंग गाडी आडवली

पृथ्वी स्टोन क्रशरवरील ब्लास्टिंगमुळे घराना हादरे , भितिंना भेगा

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर चालकासह गाडी सोडली

सिरसंगी प्रतिनिधी

सोमवारी सायंकाळी सात वाजता येमेकोड गावानजीक असलेल्या पृथ्वी स्टोन क्रशरवर ब्लास्टिंग केल्यानंतर मोठा स्फोट होऊन येथील घरांना हादरे बसले. यामध्ये नागरिकांना भूकंप झाल्याचा भास झाला लागलीच गावातील सर्व ग्रामस्थ लहान थोर मंडळी तरुण मंडळी एकत्र जमून ब्लास्टिंग सुरू असलेल्या स्टोन क्रेशर वरील गाडी अडवली व गाडी मालक झुबेर चाँद व चालकासह गावात घेऊन आले. क्रेशर मालक आल्याशिवाय गाडी सोडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. यावेळी ग्रामस्थांनी सध्या सुरू असलेल्या ब्लास्टिंग मुळे सार्वजनिक विहिरीला तडे गेले असल्याचे सांगितले . विहिरीचे सर्व पाणी पाझरून सुमारे वीस एकर जमीन क्षारपड झाल्याचे सांगितले. काही ग्रामस्थांनी घराच्या भिंतींना तडे गेल्याचे सांगितले. क्रेशर मुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले असून हवा प्रदूषित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. दोन महिन्यापूर्वी तहसीलदार प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊनही या क्रशरवर ब्लास्टिंग सुरूच असून त्यातच सुमारे वीस ते तीस फूट ब्लास्टिंग घातल्यामुळे शेत शिवारात दगडांचे खच पाहायला मिळत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले. यावेळी महिलाही आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. कोणत्याही परिस्थित क्रशर बंद करा अशी सरपंच संदीप चौगले यांचेकडे मागणी केली . यावेळी सरपंच संदीप चौगुले यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना सांगितले की उद्या नऊ वाजता तहसीलदार कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन जाऊ व क्रेशर मालक यांना त्याठिकाणी बोलवून चालू असलेले सर्व क्रशर बंद करण्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन केले.
यावेळी आजरा पोलीस ठाण्यातून हवालदार वैभव गवळी यांनी मध्यस्थी करून अडवून ठेवलेली ब्लास्टिंग ची गाडी सोडण्यासाठी आवाहन केले. यावेळी ग्रामस्थानी पुन्हा येमेकोंड परिसरात ब्लास्टिंग गाडी दिसली तर फोडून टाकण्यात येईल असा सज्जड दम दिला .

येमेकोंड येथील जमलेले ग्रामस्थ

ब्लास्टिंगमुळे घराना भेगा

संबंधित बातम्या

मिशन अंकुर परिक्षेत केंद्रशाळा सिरसंगी विध्यार्थ्यांचा ठसा

सिरसंगी प्रतिनिधी जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित मिशन अंकुर परिक्षेतील केंद्रशाळा सिरसंगीच्या विध्यार्थ्यांनी ठसा उमठविला असून यशस्वी विध्यार्थी इयत्ता…

ByByMahadev Kudav Mar 31, 2026

वनविभागाला चकवा देत ‘गणेश’ पुन्हा सिरसंगीत दाखल

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या चार दिवसापासून वनविभागाने सिरसंगीत गणेश हत्ती हुसकावून लावण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यासाठी गेले चार दिवसात…

ByByMahadev Kudav Mar 31, 2026

सिरसंगी येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ

सिरसंंगी प्रतिनिधी शिरसंगी येथील पूर्व विभाग पंचक्रोशी पारायण मंडळ तर्फे ज्ञानेश्वर पारायण सोहळा सुरू झाला असून या सोहळ्याला…

ByByMahadev Kudav Mar 28, 2026

ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे वापरा : सुभाष देसाई

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना मार्फत किणे येथे शिबिर महादेव कुडव सिरसंगी ऊसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी सोलर साफळे…

ByByMahadev Kudav Mar 26, 2026

सिरसंगी येथे 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे पंचक्रोशी वारकरी संप्रदाय मंडळ पूर्व विभाग सिरसंगी यांच्या विद्यमाने 28 ते 30 मार्च ज्ञानेश्वरी…

ByByMahadev Kudav Mar 26, 2026

सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ

कलश व पालखी मिरवणूकीत गुलालची उधळण , लहान थोर मंडळींचा सहभाग सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगीत रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाला…

ByByMahadev Kudav Mar 24, 2026

हत्तीने स्कूलबस केली पलटी ..ओमनीचे केले नुकसान

सिरसंगी गावात धुडगूस सिरसंगी प्रतिनिधी शेत शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने शनिवारी पहाटे साडेतीन वाजता सिरसंगी गावात धुडगूस घातला.…

ByByMahadev Kudav Mar 22, 2026

भादवण मध्ये नूतन जि. प. व पं ,स . सदस्यांचा सत्कार सोहळा

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना व सूर्य घर योजना राबवणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सुभाष पोवार /…

ByByMahadev Kudav Mar 21, 2026

सिरसंगी येथे हत्तीकडून दुचकीची मोडतोड

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथे गुरुवारी रात्री हत्तीने जनावरांच्या गोट्याशेजारी उभी केलेली मोटरसायकल भिरकावून देऊन मोडतोड केली . त्याचबरोबर…

ByByMahadev Kudav Mar 20, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top