आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • चंदगड – मुंबई एसटी सेवेमुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली: प्रकाश पाटकर
Image

चंदगड – मुंबई एसटी सेवेमुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली: प्रकाश पाटकर

चंदगड प्रतिनिधी

प्रकाश बाळकृष्ण पाटकर

पारगड–चंदगड–मुंबई व चंदगड–कल्याण या एस.टी. बस सेवा पुन्हा सुरू झाली अन चंदगड तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपली , कोरोना काळापासून एसटी महामंडळाकडून या बससेवा बंद करण्यात आल्या होत्या , अखेर या बससेवा सुरू करण्यात आल्यामुळे चंदगडकरांचा पुणे मुंबई दळणवळणाचा प्रश्न सोपा झाल्याचे मत हेरे येथील निवृत्त रेल्वे कर्मचारी प्रकाश बाळकृष्ण पाटकर यांनी व्यक्त केले . पाटकर पुढे म्हणाले की दोन वर्षापूर्वी रेल्वे खात्यातून निवृत्त होऊन माझ्या हेरे गावी आल्यानंतर या बंद असलेल्या बससेवांची माहिती मिळाली , यामुळे चंदगडकरांची एसटी बस अभावी होणारी परवड व एन सणासुदीच्या काळात सुट्टीच्या कालावधीत खासगी बसवाल्यांकडून प्रवाश्यांची होणारी लूट पाहून फार वाईट वाटले आणि या बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. यासाठी चंदगड तालुक्यातील हेरे, मोठणवाडी, रायदेवाडी, जेलुगडे, कळसगादे, पाटणे, पार्ले, कोळींद्रे, सावर्डे, शिपूर, कोदाळी, पारगड, मिरवेल, नामखोल, इब्राहिमपूर, इसापूर, गुडवळे, कानडी, पोवाचीवाडी, नागवे, इनाम कोळींद्रे, गवसे आदी ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन एस.टी. महामंडळाकडे पाठपुरावा केला ग्रामपंचयातीना प्रत्येक्ष भेटी देऊन बससेवा सुरू करण्यासाठी ठराव देण्याची विनंती केली . याकामी सर्व ग्रामपंचायतिचे सरपंच ,उपसरपंच ग्रामसेवक व ग्रा पं सदस्यनी सहकार्य केले. यासाठी मला मुंबई येथील भाजपा मुंबई सचिव (ओबीसी मोर्चा) मदनमोहन कुशवाहा यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे पाटकर यांनी संगीतले . प्रकाश पाटकर पुढे म्हणाले की माझे वडील बाळकृष्ण पाटकर हे एक नावाजलेले कुशल चालक म्हणून चंदगड आगारात प्रसिद्ध होते , तिलारी घाटातून एसटी बस पहिल्यांदा चालवणारे चालक म्हणून त्यांच्या कार्याची नोंद आहे – माझे मधले बंधु कै सुरेश पाटकर हे सुद्धा चालक म्हणून एसटी सेवेत कार्यरत होते , त्यामुळे एसटी महामंडळाशीआपल्याला आत्मीयता असल्याचे पाटकर सांगतात . त्याचबरोबर आपले तीन नंबरचे भाऊ चंद्रकांत पाटकर हे सुद्धा सैनिक व पोलिस दलातून निवृत्त झाले आहेत तर धाकटे भाऊ हणमंत पाटकर यांच्या दोन्ही मुली मुंबई व रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत असल्याचे सांगून शासकीयसेवांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे पाटकरानी नमूद केले .
पारगड–चंदगड–मुंबई व चंदगड–कल्याण या एस.टी. बस सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला आमदार शिवाजी पाटील यांच्यासह जि.प. सदस्या राजश्री गावडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष लक्ष्मण गावडे, चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील, संजय पाटील, रघुवीर शेलार (निवृत्त एस.टी. अधिकारी), पांडुरंग पावसकर, हेरे सरपंच राजश्री गावडे, उपसरपंच विशाल बल्लाळ, आपाजी गावडे, संतोष महागावकर, , तसेच केंचेवाडी येथील नारायण पाटील, श्रीकांत कांबळे, बाळासाहेब हळदणकर, बाबू हळदणकर आदींचे विशेष सहकार्य लाभल्याचे पाटकर यांनी सांगितले .
तसेच मुंबई येथील शिक्षण मंडळाचे मदनमोहन कुशवाहा यांनी एस.टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करून या बससेवेसाठी पुढाकार घेतलयाचे पाटकर यांनी सांगितले . या बससेवा सुरू झाल्यामुळे चंदगड तालुक्यातील मुंबई व पुणे येथे नोकरीसाठी गेलेल्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. खासगी वाहनांमधून होणारी लूट थांबण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित व किफायतशीर होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना सवलतीच्या दरात सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या नव्या बससेवेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून भविष्यात आणखी अशा सेवांचा विस्तार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले .

तिलारी घाटा ला कै बाळकृष्ण पाटकर यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार
आपले वडील कै बाळकृष्ण पाटकर हे चंदगड आगरात उत्तम एसटी चालक म्हणून नावाजलेले होते ,कोकण व गोवाशी जोडलेल्या तिलारी घाटातून चार चाकी चालवणे म्हणजे जिवावर उदार होऊन चालवणे असेच होते ,त्यासुमारास चंदगड दोडामार्ग बस पहिल्यांदा तिलारी घाटातून चालवण्याचे धाडस बाळकृष्ण पाटकर केले होते , या धाडसाबद्दल त्यांचा चंदगड आगाराकडून सत्कारही करण्यात आला होता , यानंतर या घाटातून एसटी महामंडळाच्या बससेवेसह बेळगाव येथील बस गाड्याही धावू लागल्या , चंदगड तसेच सीमाभागातील युवकांना कोकण व गोव्यात रोजगारासाठी हा तिलारी मार्ग अगदी जवळचा व उपयुक्त ठरला आहे . यामुळे चंदगड भागातील नागरिकांची मागणी घेऊन आम्ही या तिलारी घाटला कै बाळकृष्ण पाटकर यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले .

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026
1 Comments Text
  • suge789slot says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    If you love slots then this is the place to be. The jackpot hits are more frequent than other sites I have used. suge789slot is the real deal.
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top