जि प सदस्य सुधीर देसाई यांचे प्रतिपादन
सिरसंगी प्रतिनिधी
माझ्या विजयात शिरसंगीसह परिसरातील गावांचा मोठा वाटा असल्याचे सांगून संपूर्ण भागाच्या विकास करण्याची जबाबदारी आता माझी असल्याचे सांगितले.
सुरुवातीला स्वागत आजरा साखर कारखाना व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई यांनी केले. तर तर प्रास्ताविक आजरा साखर कारखाना संचालक शिवाजीराव नांदवडेकर यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम शिरसंगी येथील हनुमान दूध संस्था सभागृहामध्ये पार पडला.
यावेळी सुधीर देसाई यांनी शासकीय योजनांसह वैयक्तिक लाभाच्या योजनाही तालुक्याच्या वाड्या वस्त्या पर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले. तर शिरीष देसाई यांनी आपल्या विजयात वैद्यकीय शिक्षण मंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांचे योगदान मोठे असून सर्वसामान्य कार्यकर्ते पाठीशी खंबीरपणे राहिल्यामुळे आपल्याला विजय साकारता आल्याचे सांगितले.
यावेळी आजरा कारखान्याचे संचालक शिवाजीराव नांदवडेकर यांनी राष्ट्रवादीला आता सुगीचे दिवस आल्याचे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून संपूर्ण तालुक्याचा विकास करून घेऊया असे आवाहन केले.
आजरा तालुका शेतकरी संघाचे संचालक मधुकर येलगार यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वांनी मतभेद विसरून ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया असे आवाहन केले.
यावेळी आजरा कारखाना माजी चेअरमन वसंतराव धुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य जयश्री गाडे, यशोदा पवार, युवराज पवार श्री घोरपडे सर राजू होलम जयराम संकपाळ संजय गाडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला महादेव देसाई, सुरेश येलगार, अशोक चौगुले, चंद्रकांत देसाई बाळू सडेकर अशोक यलगार बाळकु कोकितकर दत्तात्रय देसाई धोंडीबा कुंभार पांडुरंग कानडे , प्रकाश कांनडे, बाळासाहेब घोरपडे, नामदेव कसेकर ,संजय कुंभार ,सुभाष चौगुले उपस्थित होते. विजय देसाई यांनी आभार मानले.

















