आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • वाटंगी येथे शिवजयंती उत्साहात
shivjayanti

वाटंगी येथे शिवजयंती उत्साहात

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता

सिरसंगी प्रतिनिधी

वाटंगी दत्तनगर येथे शिवजयंती उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम माजी उपसरपंच स्वातीताई कबीर व छवा ग्रुप यांच्या संयोजनातून करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने देखील छत्रपती शिवाजी चौक येथे व वाटंगी हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. दत्तनगर येथे जान्हवी विश्वास कांबळे हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याविषयी माहिती सांगितली तर साईल बिर्जे याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर भाषण केले . यावेळी भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव नांदवडेकर यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. यावेळी सरपंच इंदुबाई कुंभार, माजी सरपंच शिवाजीराव नांदेडकर संजय पवार ,बाबुराव गिलबिले , गोकुळ दूध संस्थेचे व्हा.चेअरमन विश्वास कांबळे शिवाजी देवलकर , अंकुश सुतार, अर्जुन कबीर, सन्मित्र पतसंस्थेचे व्हा. चेअरमन भीमराव सुतार उपस्थित होते. सूत्रसंचलन संजय पवार यांनी केले. सायंकाळी दत्तनगर येथे महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

कु जान्हवी कांबळे हिचा सत्कार करताना

संबंधित बातम्या

केंद्रशाळा सिरसंगी येथे पालक मेळावा उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधि सिरसंगी : केंद्र शाळा सिरसंगी येथे पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे…

ByByMahadev Kudav Aug 29, 2026

रवळनाथ विकास सेवा संस्थेला 2 लाख 45 हजार रुपयांचा नफा

चेअरमन मधुकर येलगार यांची माहिती; वार्षिक सर्व साधारण सभा सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेला…

ByByMahadev Kudav Aug 28, 2026

शिरसंगी आदर्श हायस्कूलमध्ये पार पडला विध्यार्थी गुणगौरव सोहळा

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल शिरसंगी प्रशालेमध्ये एसएससी मार्च 2026 परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार…

ByByMahadev Kudav Aug 22, 2026

श्रमिक तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महादेव सुतार

सिरसंगी प्रतिनिधी किणे.येथील श्रमिक तरुण मंडळांची सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा…

ByByMahadev Kudav Aug 21, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top