आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • दैनिक बातम्या
  • वसंतराव देसाई साखर कारखाना वतीने नूतन जि. प., पं. समिती सदस्यांचा सत्कार
जि प सदस्य सत्कार

वसंतराव देसाई साखर कारखाना वतीने नूतन जि. प., पं. समिती सदस्यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा परिषद व आजरा पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत तालुक्यातील पेरणोली गटातून जिल्हा बँक संचालक व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री सुधीर भाऊ देसाई व उत्तूर जिल्हा परिषद गटातून श्री शिरीष देसाई हे भरघोस मतांनी निवडून आले. त्याच बरोबर पंचायत समिती गणातून श्री विकास चोथे, सौ.जयश्री गाडे व सौ. यशोदा पोवार या निवडून आल्या. त्यांचा कारखाना संचालक मंडळ सभेत सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष श्री मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष श्री सुभाष देसाई, माजी अध्यक्ष श्री वसंतराव धुरे व संचालक श्री शिवाजी नांदवडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. सत्काराला श्री सुधीर भाऊ देसाई, शिरीष देसाई व युवराज पोवार यांनी उत्तर देताना मा.ना. हसन मुश्रीफ साहेब व आपल्या सर्व जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळेच ही निवडणूक आपण जिंकली आहे. आम्ही जनतेच्या हिताची कामे करू अशी ग्वाही दिली. यावेळी माजी सभापती रचना होलम यांच्या हस्ते नूतन प. समिती सदस्या जयश्री गाडे व यशोदा पोवार यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी एम के देसाई , अनिल फडके , वसंतराव धुरे , उदय पोवार , राजू होलम यांच्यासह आजरा कारखाना संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता-

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

केंद्र शाळा सिरसंगी येथे पाककृती स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिरसंगी प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शाळा सिरसंगी येथे महिला पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

मोरेवाडी धनगरवाड्यात बिबट्याचा धुमाकूळ; तीन शेळ्यांचा फडशा दोन शेळ्या गायब

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४…

ByByMahadev Kudav Sep 9, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top