आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • 1995 च्या दहावीच्या बॅचचे 30 वर्षानंतर गेट टुगेदर
Image

1995 च्या दहावीच्या बॅचचे 30 वर्षानंतर गेट टुगेदर

दिल्या जुन्या आठवणीना उजाळा केली धम्माल मस्ती

सिरसंगी प्रतिनिधी

आदर्श हायस्कूल सिरसंगी च्या 1995 च्या दहावीच्या बॅचच्या विध्यार्थीनी 31 वर्षानंतर गेट टुगेदर करून जुन्या आठवाणिना उजाळा दिला. अगदी पन्नाशीत पोहचलेल्या वर्गमित्र मैत्रिनीनी आजरा तालुक्यातील निसर्गसंपन्न अश्या उचंगी धरण प्रकल्पावर एकत्र येऊनआपल्या कडू गोड आठवणीना उजाळा दिला. या वर्गमित्रांमध्ये कांहीजन वेगवेगळ्या कंपनीत उच्च पदावर पोहचलेले तर कांही व्यावसाईक,उधोजक असलेले कांहीजनी गृहिणी तर कांहीजन शेतकरी अश्या या 1995 च्या दहावीच्या बॅचच्या सिरसंगी व वाटंगी येथील वर्गमित्राणी एकत्र येऊन गेट टुगेदर साजरा करण्याचे ठरवले, सुरुवातीला गीता चौगले हिने व्हाटसप्प ग्रुप काढून सर्व मित्र मैत्रिणीना सामील करून घेतले यामध्ये एकत्र भेटण्यासाठी तारीख ठरवली गेली , 10 मे रोजी भेटण्याचे ठरवण्यात आले . याचे नियोजन सुनील जाधव उत्तम जाधव, धनंजय देसाई , मदन देसाई यांनी केले , सुरुवातीला सर्वानी आपले वर्गमित्र कै संभाजी पताडे , बाळू कांबळे याना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कुटुंबियाना मदतीचा हात देण्याचे ठरवण्यात आले. सकाळी चहा नास्ता सर्वांची ओळख , शाळेतील जुन्या आठवणी यामध्ये दुपार कशी गेली कळलेच नाही त्यानंतर एकत्र जेवण करण्यात आले, त्यानंतर विश्वास साटपे यांनी दोस्तीवर गाणे गाऊन सर्वाचे मनोरंजन केले , राजू बुडके ,संजय वांद्रे , बाळू माटले पांडुरंग कुंभार सदाशिव परीट , कृष्णा होडंगे, उदय जाधव रवी जाधव प्रदीप धडाम यांनी नृत्ये केले , यानंतर उदय जाधव यानी आपल्या मनोगतात प्रत्येकजन आज आपण अश्या उंबरठ्यावर आहोत की या वयातआपल्याला पैश्यापेक्षा शरीर संपत्ति सांभाळणे गरजेचे असल्याचे सांगितले . ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत ज्ञानदानाचे काम करण्याची संधी मिळाल्याचे शिक्षक मदन देसाई यांनी व्यक्त केले , आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना पीएसआय शरद डोंगरे यांनी आपण कोणत्याही वशिल्याशिवाय मी या पदपर्यंत पोहचलो असल्याचे सांगितले , यावेळी नंदा देसाई हिने आपण गृहिणी असून या बदलत्या काळात आपण अद्यात्मकडे वळणे गरजेचे असल्याचे सांगितले, सुरुवातीला दहावी मध्ये कमी मार्क घेऊनही पुन्हा जिद्धीने अभ्यास करून आज एका कंपनीची एच आर बनलेल्या गीता चौगले हिचेसुद्धा सर्वानी कौतुक केले . तर आठवी नववी दहावी मध्ये अभ्यासात कमी पडलो होतो पण आज एक कंपनीचा सीईओ असल्याचे सांगत मी यासाठी खूप स्ट्रगल केल्याचे संजय वांद्रे यांनी सांगितले .
राजू बुडके यांनी 12वी पर्यंत आपण शिकलो परिस्थितिमुळे हॉटेलमध्ये नोकरी करावी लागली त्यामध्येच करियर केले पण सध्या वडिलांच्या सेवेसाठी गावीच शेती करत असल्याचे सांगितले . पांडुरंग कुंभार यांनी सुद्धा कॅन्सरग्रस्त आईची सेवा करत असल्याचे सांगितले. पण बालपणीचे मित्र भेटल्यानंतर आपल्या दुखाचा भार हलका झाल्याचे या सर्व मित्र मैत्रीनीनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . यावेळी या दहावीच्या ग्रुपकडून शाळेसाठी कपाट भेट देण्यात आले .
यामध्ये चंद्रकांत वांद्रे , प्रकाश कानडे , बाळू माटले , नामदेव कसेकर, राजू बुडके , प्रकाश दळवी , सदाशिव परीट ,रवी जाधव , तानाजी सोनार , राम नेवरेकर , अनिल देसाई, चंद्रकांत देसाई , मारुती सावंत , परशुराम जाधव , शोभा जाधव , सुवर्णा देसाई , तायाका जाधव , कल्पना चौगुले , लक्षता गुरव , सरला बुरूड ,नंदा देसाई , विमल बुडके उपस्थित होते .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top