सिरसंगी प्रतिनिधी
शिरसंगी येथील केंद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा व मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती मुलींनी पारंपरिक साडी नेसून जिजामाता यांची वेशभूषा केली होती. काही विद्यार्थ्यांनी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज , मावळे यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांमुळे वातावरण शिवमय झाले होते. यासाठी शिक्षक उत्तम कोकीतकर मुख्याध्यापक शिवाजी बोलके शिक्षक संतराम केसरकर संजय केसरकर लक्ष्मण कुंभार सुप्रिया पाटील. संदीप कुंभार यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
















