आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

खोडवा ऊस होतोय फस्त, हत्ती बरोबर फिरतोय गव्यांचा कळप

महादेव कुडव सिरसंगी

सध्या आजरा तालुक्यातील सिरसंगी येथील शेतशिवारात हत्तीने धुमाकूळ घातला असून हत्तीबरोबर गव्यांचा कळप आलेले खोडवा पीक फस्त करत आहे दररोज सुमारे ४ ते ५ एकर शिवारातील ऊसाचे खोडवा पीक गव्यांकडून फस्त होत आहे. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर पडला आहे . गेले दहा दिवस हत्तीकडून शेतात असलेले पाईपलाईन पाण्याची टी चे नुकसान, केळी काजू ची झाडे मूळापासून उपटून टाकत आहे . बुधवारी रात्री सुरेश सावंत यांची रचलेली गवत व पयान गंजी शिवारभर विस्कटली असून त्यांच्या पाईपलाईन ही नुकसान केले आहे दशरथ येलगार यांची गोट्याशेजारी उभी केलेली बैलगाडीचे नुकसान करून उभ्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे . गेले चार दिवस हत्तीबरोबर ३० ते ३५ गव्यांचा कळप फिरत असून उसाचे खोडवा पीक फस्त करत आहेत. गेल्या चार दिवसात चाळू सावंत, लक्ष्मण सावंत, शेवंता सावंत, बाजीराव पाटील यांच्या खोडवा पिक फस्त केले आहे .

हत्तीच्या भीतीपोटी ऊस पिकाचे राखण करणे अवघड झाले आहे. दररोजचे होणारे पिकाचे नुकसान व वनविभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे . वनविभागाने आमची शेतीच भाडेतत्वावर घ्यावी व आमचे पालनपोषण करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .

लक्षमी पाटील यांच्या ऊस पिकाचे नुकसान
सुरेश सावंत यांच्या ऊस खोडवा पिकाचे गव्यांच्या कळपाने केलेले नुकसान
शंकर पाटील यांच्या काजूच्या झाडाचे केलेले नुकसान
चाळू सावंत यांच्या शेतात हत्तीकडुन झालेले नुकसान

संबंधित बातम्या

शिरसंगीत रोड रोलर चे हत्तीकडून नुकसान

सिरसंगी प्रतिनिधी खडीकरण व डांबरीकरणासाठी उभ्या असलेल्या रोड रोलर दहा फूट फरफटत नेत हत्तीने रोड रोलर च्या केबिन…

ByByMahadev Kudav Mar 2, 2026

तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहणार

जि प सदस्य सुधीर देसाई यांचे प्रतिपादन सिरसंगी प्रतिनिधी माझ्या विजयात शिरसंगीसह परिसरातील गावांचा मोठा वाटा असल्याचे सांगून…

ByByMahadev Kudav Feb 28, 2026

वाटंगीतील ज्येष्ट नागरिक पांडुरंग नाईक यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी गावचे पोलीस पाटील पुंडलीक नाईक यांचे वडील श्री पांडुरंग बाबू नाईक वय 75 यांचं अल्पशा…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

शिक्षण हक्क यात्रेला आजऱ्यातून उस्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी प्रतिनिधी चंदगड ते कोल्हापूर दरम्यान निघालेल्या शिक्षण हक्क यात्रेला आजरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाडी–वस्तीवरील शाळा टिकवणे…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

हत्तीचा धिंगाणा

सिरसंगी प्रतिनिधी गेले कित्येक महिन्यापासून वास्तव्यास असलेला हत्तीने आता शेतकऱ्यांच्या शिवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली असून. रचलेल्या गवताच्या…

ByByMahadev Kudav Feb 26, 2026

किणे त 22रोजी वधू – वर मेळावा

सिरसंगी प्रतिनिधी किने येथे विम विवाह संस्था नेसरी संचलित समस्त मराठा समाज वधू वर व पालक परिचय मेळावा…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

अखिल भारतीय मराठा संघातर्फे आजऱ्यात शिवजयंती साजरी

सिरसंगी प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा संघ मराठा महासंघ तालुका आजरा यांच्या तर्फे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

वाटंगी येथे शिवजयंती उत्साहात

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी दत्तनगर येथे शिवजयंती उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम माजी उपसरपंच स्वातीताई कबीर…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

सिरसंगी येथील केंद्र शाळेत शिवजयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी येथील केंद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा व…

ByByMahadev Kudav Feb 19, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top