आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • अखिल भारतीय मराठा संघातर्फे आजऱ्यात शिवजयंती साजरी
ajara shivjayanti maratha mahasangh

अखिल भारतीय मराठा संघातर्फे आजऱ्यात शिवजयंती साजरी

सिरसंगी प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठा संघ मराठा महासंघ तालुका आजरा यांच्या तर्फे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला . स्वागत व प्रास्ताविक संभाजी इंजल यांनी केले
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पूजन तालुका अध्यक्ष बंडा चव्हाण व जिल्हाध्यक्ष मारोतराव मोरे , उपनगराध्यक्ष सौ पूजा अश्विन डोंगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी शरण्य कुंभार सिद्धि नाईक व स्वराली ओतारी या मुलींनी शिवगर्जना व ध्येयमंत्र सादर केला तदनंतर डॉ. भोसले मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगासंदर्भात मनोगत व्यक्त केले . त्यावेळी त्या म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रीयांबाबत अत्यंत दक्ष होते स्त्रियांवर अन्याय झाल्यास रांझ्याच्या पाटलासारखी अवस्था करणारे आणि आणि बहुजन समाजाला एक करून अन्यायी मुघल सत्तेविरुद्ध उभे करून स्वातंत्र्य मिळवून दिले असे त्या म्हणाल्या यानंतर आजरा हायस्कूल ची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी रिया संतोष पारपोलकर हिने हिरकणीने आपली सुटका कशी करून घेतली याबद्दल छोटेसे नाट्य सादर केले याबरोबरच व्यंकटराव हायस्कूल आजरा ची पाचवीतील विद्यार्थिनी स्वराली सागर सावंत हिने पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती सही सलामत सुटण्यासाठी शिवा काशिदने जी भूमिका वठवलीआपले बलिदान देशासाठी दिली याचे सादरीकरण केले याबद्दल या दोघीनाही रोख रुपये 250 व शील्ड हे बक्षीस तालुका महिला अध्यक्ष सौ मीनल इंजल व जिल्हा महिला उपाध्यक्ष भैरवी सावंत यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले. विशेष करून महिला लेझीम सादरीकरण मध्ये मुरुडे संघ व मसुली संघ यांनी भाग घेतला त्यांनाही उपनगराध्यक्ष सौ पूजा डोंगरे, माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी व इतर महिला पदाधिकारी यांच्या शुभहस्ते रुपये 5000 रोख व शील्ड असे पारितोषिक वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मोरे ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्यातर्फे शील्ड देण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपाध्यक्ष शंकराव शिंदे ,शिवाजीराव पाटील, सरचिटणीस प्रकाशराव देसाई , गणपती गणपतराव डोंगरे, शिवाजीराव एंजल चंद्रकांत पारपोलकर , सीआर देसाई ,राजेंद्र सावंत ,धनश्री देसाई ,महादेवराव पवार , भाऊसो निर्मळे ,आनंदा गावडे, राजू होलम त्याचबरोबर सौ गोडसे , सौ शिंदे, सौ मोरे, गीता नाईक , नगरसेविका अश्विनी चव्हाण, अनिकेत चराटी ,असिफ सोनेखार, व डॉ. स्मिता कुंभार आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते .
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संभाजी एंजल आणि आभार सीआर देसाई यांनी मांडले.

संबंधित बातम्या

शिरसंगीत रोड रोलर चे हत्तीकडून नुकसान

सिरसंगी प्रतिनिधी खडीकरण व डांबरीकरणासाठी उभ्या असलेल्या रोड रोलर दहा फूट फरफटत नेत हत्तीने रोड रोलर च्या केबिन…

ByByMahadev Kudav Mar 2, 2026

तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहणार

जि प सदस्य सुधीर देसाई यांचे प्रतिपादन सिरसंगी प्रतिनिधी माझ्या विजयात शिरसंगीसह परिसरातील गावांचा मोठा वाटा असल्याचे सांगून…

ByByMahadev Kudav Feb 28, 2026

वाटंगीतील ज्येष्ट नागरिक पांडुरंग नाईक यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी गावचे पोलीस पाटील पुंडलीक नाईक यांचे वडील श्री पांडुरंग बाबू नाईक वय 75 यांचं अल्पशा…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

शिक्षण हक्क यात्रेला आजऱ्यातून उस्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी प्रतिनिधी चंदगड ते कोल्हापूर दरम्यान निघालेल्या शिक्षण हक्क यात्रेला आजरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाडी–वस्तीवरील शाळा टिकवणे…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

हत्तीचा धिंगाणा

सिरसंगी प्रतिनिधी गेले कित्येक महिन्यापासून वास्तव्यास असलेला हत्तीने आता शेतकऱ्यांच्या शिवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली असून. रचलेल्या गवताच्या…

ByByMahadev Kudav Feb 26, 2026

किणे त 22रोजी वधू – वर मेळावा

सिरसंगी प्रतिनिधी किने येथे विम विवाह संस्था नेसरी संचलित समस्त मराठा समाज वधू वर व पालक परिचय मेळावा…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

वाटंगी येथे शिवजयंती उत्साहात

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी दत्तनगर येथे शिवजयंती उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम माजी उपसरपंच स्वातीताई कबीर…

ByByMahadev Kudav Feb 20, 2026

सिरसंगी येथील केंद्र शाळेत शिवजयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी येथील केंद्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा व…

ByByMahadev Kudav Feb 19, 2026

वसंतराव देसाई साखर कारखाना वतीने नूतन जि. प., पं. समिती सदस्यांचा सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा परिषद व आजरा पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत तालुक्यातील पेरणोली गटातून जिल्हा बँक…

ByByMahadev Kudav Feb 19, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top