आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
आंबेडकर जयंती

सिरसंगीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथे भीमराव युवा मंच तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, भाषणे आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गावातील नागरिक, युवक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच संदीप चौगले होते.

स्वागत व प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य सी आर देसाई यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व सांगत बाबासाहेबानी समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश दिला. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ आणि कायदेपंडित होते. त्यांनी भारतातील अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले आणि “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान तयार करण्यात आले, ज्यामुळे सर्व नागरिकांना समान हक्क मिळाले.१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली , यावेळी सरपंच संदीप चौगले, आजरा साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन सुभाष देसाई ,संचालक दिगंबर देसाई , तालुका शेतकरी संघाचे संचालक मधुकर येलगार , भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चौगले यांनी मनोगते व्यक्त केली . पोश्रातवाडी चे सामाजिक कार्यकर्ते बाळू चवरे यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन केले. आभार पांडुरंग कांबळे यांनी मानले , यावेळी अशोक चौगले, पांडुरंग टकेकर, शिवाजी होडगे , हभप दत्तात्रय कांबळे, रवींद्र गायकवाड , सागर कुंभार , थळबा कांबळे गुरुजी , पिराजि कांबळे , वसंत कांबळे , बाबुराव कांबळे , तुकाराम कांबळे ,संजय कांबळे , प्रकाश कांबळे , विष्णु कांबळे , सतीश कांबळे, गौतम कांबळे , सचिन कांबळे , गंगाराम कांबळे , नारायण कांबळे , जीवन कांबळे , आनंदा कांबळे . विठ्ठल कांबळे , विश्वास कुमठेकर तर येमेकोंडहून निंगप्पा कांबळे, प्रकाश कांबळे गणपा कांबळे उपस्थित होते . सायंकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली . त्यानंतर भिमारायची गाथा हा गाण्यांचा कार्यक्रमाने कार्यकर्माची सांगता करण्यात आली .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भीमराव युवा मंचच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top