आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीत हत्तीने नदीत फेकल्या पाण्याच्या मोटर
Image

सिरसंगीत हत्तीने नदीत फेकल्या पाण्याच्या मोटर

केबल, पाइप लाइन सह पाण्यातील ड्रमचे नुकसान

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी ता आजरा येथे रविवारी रात्री 11 वाजता हत्तीने शेतकऱ्यांच्या नदी काठी असलेल्या पाण्याच्या मोटरी नदीत फेकल्या असून रात्री गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासमोरच हत्तीने धुमाकूळ घातला आहे . जंगलालगत शेतशीवरात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीने आता गावा लगत असलेल्या नदीमध्ये मनसोक्त डुबकी घेत आहे पण त्याचबरोबर नदीकाठी शेतकऱ्यांनि बसवलेल्या पाण्याच्या मोटरी केबल, पाइप लाइन सह नदीत फेकून देत आहे . यामुळे शेतकऱ्यासमोर शेती करायची कशी आस प्रश्न भेडसावत आहे . सिरसंगी येथील सुभाष चौगले यांच्या दोन 7.5 एचपी मोटर तर मारुती कुंभार यांची 5 एचपी मोटर केबलसह नदीमध्ये फेकून दिल्या आहेत . सोमवारी सुमारे दुपारी तीन तास युवकाना नदीमध्ये पोहून दोन मोटर शोधून काढण्यात यश आले . हत्तीच्या दररोजच्या त्रासापुढे शेतकरी हतबल झाला आहे .

कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर उचंगी धरण झाले धरणामुळे ऊसाचे उत्पादनात वाढ होणार या आशेपोटी शेतकरी नदी काठी पाण्याच्या मोटरी बसवून पाइप लाइन योजना राबवून जंगलापर्यंत शेतशीवार हिरवागार केला . पण दुसरीकडे शिवारातच पाण्याची सोय झाल्यामुळे हत्ती . वन गवे , रान गायरे , रान डुक्कर अश्या रानटी प्राण्याचा उपद्रव वाढला . शेती शिवारातील ऊस पिक हात तोंडाशी आलेली भातपिके नाचणी पिकांची उघड्या डोळ्यानि झालेले नुकसान शेतकऱ्याना पहावे लगत आहे . त्यात कहर म्हणजे हत्तीकडून सुरू असलेला धुमाकूळ . वनविभागाकडून मिळणारे तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर पडला आहे . गेल्या पाच सहा वर्षापासून हत्ती या भागात दोन तीन महिन्याच्या वास्तव्यासाठी येत असे पण यावर्षी गेल्या सहा महिन्यापासून हत्ती सिरसंगी येमेकोंड जंगलात तळ ठोकून आहे . यामुळे राखाणीसाठी शेतकाऱ्याना जाणे अवघडीचे झाले आहे. त्यात भर म्हणजे 30 -40 रान गव्यांचा कळप शेतशीवार फस्त करत आहे . त्यामुळे वनविभागाणे आपली जनावारे आपण सांभाळावीत अन्यथा आम्हाला हातात कायदा घ्यावा लागेल असा इशारा शेतकऱ्यानी दिला आहे .

सिरसंगी येथे बाळू शंकर सावंत यांच्या शेतशीवारात हत्तीचे दर्शन

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top