सिरसंगी प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील यमेकोंड येथील नम्रता विनायक कातकर यांनी वाणिज्य विषयात पीएचडी मिळवली असून मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठातून त्यांनी प्रधानमंत्री स्ट्रिट वेंडर आत्मनिर्भर निधी योजना या विषयावरती त्यांनी शोधनिबंध लिहून पीएचडी मिळवली आहे प्रधानमंत्री निधी योजनावर शोध निबंध लिहनाऱ्या डॉ नम्रता कातकर या पहिल्या महिला व्यक्ती ठरल्या आहेत त्यांचे येमेकोंड सह परिसरातून कौतुक होत आहे. त्यांना याकामी त्यांचे पती विनायक कातकर व सासरे महादेव कातकर यांचे सहकार्य लाभले .














