आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • अग्निवीर वैभव कुंभार यांचा सिरसंगी केंद्र शाळेतर्फे सत्कार
Image

अग्निवीर वैभव कुंभार यांचा सिरसंगी केंद्र शाळेतर्फे सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी

सिरसंगी येथील भारतीय सैन्यात टेक्निकल विभागात निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वैभव संजय कुंभार यांचा सिरसंगी केंद्र शाळेतर्फे सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक शिवाजी बोलके सर होते , सुरुवातीला मुलीनी स्वागत गीत गाऊन पाहुण्याचे स्वागत केले . शाळा व्यवस्थापन कमिटी व केंद्र शाळेतर्फे वैभव याना पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देण्यात आले . संतराम केसरकर यांनी स्वागत करून प्रस्ताविकात भारतीय सैन्यदलाविषयी माहिती दिली यावेळी वैभव कुंभार यांनी आपण घेतलेल्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणविषयी शाळाविषयी माहिती सांगितली , त्याचबरोबर भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी कोणत्या गोष्ठी महत्वाच्या असतात अभ्यास व मैदानी खेळाचा सराव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रशिक्षण घेत असताना आलेले अनुभव सांगितले , वैभवने अनुभव सांगितल्यानंतर केसरकर सरानी मुलाना सैन्य दलात कोण कोण जाणार असे विचारताच साऱ्या मुलानी उत्साहाने हात वर केले . यावेळी मुख्याद्यापक शिवाजी बोलके यांनी मुलाना मार्गदर्शन केले , शाळा कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे यांनी वैभव हा कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा असून त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अग्निवीर बनल्याचे सांगितले . यावेळी केंद्र प्रमुख करवीर गोरे , सुप्रिया पाटील , लक्ष्मण कुंभार , श्री पाटील सर , श्री महादेव कुडव उपस्थित होते .आभार उत्तम कोकितकर यांनी मानले.

प्रशिक्षण दरम्यान आलेले अनुभव व्यक्त करताना अग्निवीर वैभव कुंभार

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top