आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • हंदेवाडी येथील प्रणालीला “स्टार आयकॉन ‘ पुरस्कार प्रदान
Image

हंदेवाडी येथील प्रणालीला “स्टार आयकॉन ‘ पुरस्कार प्रदान

  • भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क च्यावतीने भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार
  • भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे हस्ते पुरस्कार प्रदान
  • आजरा तालुक्यातील हंदेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

सिरसंगी प्रतिनिधी
हंदेवाडी तालुका आजरा येथील सुपुत्र,प्रसिद्ध उद्योजक मोहन परशराम हेब्बाळकर यांची कन्या कुमारी प्रणाली हेब्बाळकर हिला नुकताच भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क च्या वतीने यावर्षी चा भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.. प्रणालीने फ्रान्स मध्ये झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवलसाठी तयार केलेल्या ड्रेस ची माहिती संपूर्ण जगभरात पोचली याची दखल घेऊन सदर पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.यावेळी संपादिका सौ.मनिषाताई लोहार व महाराष्ट्र जर्नलिस्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ.राजीव लोहार तसेच सोहळ्यासाठी आमदार भीमराव तापकीर आण्णा पुणे,नंदकुमार उर्फ बाबूजी वाळंज,सौ.तृप्तीताई देसाई अध्यक्षा भूमाता ब्रिगेड,दिलीप बागडे पाचगणी नगरपरिषद, पियु धनवडे कोल्हापूर,राणी बबिता मुसळे लावणी कलाकार सोलापूर,हभप कृष्णा फाटे महाराज विश्व हिंदू परिषद धर्माचार्य रायगड, ॲड.दिलीप जगताप,डॉ.सुचिता पाटील,अभिजीत पाटील,साक्षी कालवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच मदन हेब्बाळकर,चंद्रकांत हेब्बाळकर,सुशांत जाधव,वडील मोहन, आई सौ.रेखा,पत्रकार पुंडलिक सुतार, समस्त हेब्बाळकर परिवार उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026
1 Comments Text
  • anti-violence-976048 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    [788777]supplies professional anti-violence equipments and solutions for the whole world with strong and perfect production capacity. anti-violence.org
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top