आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • हंदेवाडीकरांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Image

हंदेवाडीकरांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आजरा पंचायत समिति प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष – ग्रामस्थांचा आरोप

सिरसंगी प्रतिनिधी

हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे 99 लाखांची कामे प्रशासन च्या निष्काळजीपणाने रखडली असून,संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन व जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचेकडे करण्यात आली आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की सदर वसाहतीमध्ये पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होतो.लोकांना चालणे ही अशक्य होते. अशी अवस्था ग्रामपंचायतीला माहीत असूनही सदर वसाहतीतील रस्ते करण्याची टाळाटाळ केली. सदर रस्ते डिसेंबर 2025 मध्ये मंजूर होऊनही या वसाहती मध्ये रस्त्यांची नितांत आवश्यकता असूनही संबंधितांनी टाळाटाळ केली असून सदर निधीची मुदत 31 मे ला संपणार असल्याचे समजते. तरी जर निधी परत गेला तर संबंधित प्रशासन व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी ,प्रशासन ,ठेकेदार यांचेवर दंडात्मक कार्यवाही करावी . असे निवेदनात नमूद करण्यात आले असून. निवेदनात पुढे म्हटले आहे की बी.डी.ओ.सुभाष सावंत यांना निवेदन देऊनही त्यांनी घटनास्थळाची कोणतीही माहिती व पाहणी केली नाही असे म्हटले आहे. तसेच सदर वसाहती मध्ये पिण्याच्या पाण्याची व वीज खांबावर वीज बल्ब बसविण्याची व्यवस्था करावी. तसेच गावातील रस्त्याचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही त्याचीही चौकशी व्हावी.असे म्हटले आहे.. निवेदनावर, शीतल कदम, छाया चव्हाण, आनंदा शिंदे, संभाजी जाधव, शालू कांबळे, रविंद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

निवेदनाच्या प्रति ,बांधकाम व आरोग्य सभापती जी. प . व म. न. रे. गा. विभाग यांना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन महसूल तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी स्वीकारले.तर जी. प.कार्यालयात कृषी अधिकारी अजित खताळ यांनी निवेदन स्वीकारले.तरी संबंधित अधिकारी यांनी पावसाळ्यापूर्वी वसाहतीतील रस्ता मार्गस्थ लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

आदर्श हायस्कूल सिरसंगीमध्ये महात्मा गांधी , लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी आदर्श हायस्कूल सिरसंगी प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

पावसासाठी प्रार्थना करणाऱ्या गणू कसेकर यांचा येमेकोंडकरांकडून सत्कार

सिरसंगी प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने यमेकोंड परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत…

ByByMahadev Kudav Oct 2, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top