आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
Image

शिरसंगीत रोड रोलर चे हत्तीकडून नुकसान

सिरसंगी प्रतिनिधी

खडीकरण व डांबरीकरणासाठी उभ्या असलेल्या रोड रोलर दहा फूट फरफटत नेत हत्तीने रोड रोलर च्या केबिन ची मोडतोड केली आहे. तसेच वसंत देवळे यांच्या केळी व ऊस पिकाचे नुकसान केले आहे.
शिरसंगी येथे गोठणदेव ते काळवाट शेत रस्त्याची खडीकरणावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम कानोलीचे भोसले हे ठेकेदार काम करत असून त्यांचे रोड रोलर चे मशीन हे काम संपल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभी केली असता. रविवारी रात्री हातीने सदर मशीनच्या केबिनची मोडतोड करून सुमारे दहा फूट सदर मशीन फरफटत पुढे नेली. सुदैवाने मातीचा ढिगारा लागल्याने रोड रोलर त्याच ठिकाणी थांबून राहिला. हत्तीच्या या आक्रमकतेने शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तीने यानंतर सी आर देसाई यांच्या काजूच्या झाडांचे मोडतोड केली त्याचबरोबर वसंत देवळे यांच्या केळीचे झाडांचे नासधूस करून जंगलात प्रयाण केले.
शनिवार रात्री हत्तीने पो पाटील दत्तात्रय गुरव व विजय बाजीराव देसाई यांच्या पाणी सोडलेल्या ऊस खोडव्यात चक्क लोळण घेत दहा गुंठे शिवाराचे चिखल मैदान करून टाकले आहे. शिरसंगी वाटंगी रस्त्यादरम्यान असलेल्या दिशादर्शक फलकाची मोडतोड करून सदर फलक हा रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. यामुळे हत्ती कडून शेतकऱ्यांसह सार्वजनिक मालमत्तेंचे हे नुकसान होत आहे . वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असून. एखाद्या व्यक्तीचा प्राण गेल्यानंतरच वन विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल ही शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

रोड रोलरचे हत्तीने केलेले नुकसान
सिरसंगी वाटंगी रस्त्या दरम्यान असलेला फलकाचे केलेली मोडतोड

संबंधित बातम्या

तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहणार

जि प सदस्य सुधीर देसाई यांचे प्रतिपादन सिरसंगी प्रतिनिधी माझ्या विजयात शिरसंगीसह परिसरातील गावांचा मोठा वाटा असल्याचे सांगून…

ByByMahadev Kudav Feb 28, 2026

वाटंगीतील ज्येष्ट नागरिक पांडुरंग नाईक यांचे निधन

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी गावचे पोलीस पाटील पुंडलीक नाईक यांचे वडील श्री पांडुरंग बाबू नाईक वय 75 यांचं अल्पशा…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

शिक्षण हक्क यात्रेला आजऱ्यातून उस्फूर्त प्रतिसाद

सिरसंगी प्रतिनिधी चंदगड ते कोल्हापूर दरम्यान निघालेल्या शिक्षण हक्क यात्रेला आजरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाडी–वस्तीवरील शाळा टिकवणे…

ByByMahadev Kudav Feb 27, 2026

हत्तीचा धिंगाणा

सिरसंगी प्रतिनिधी गेले कित्येक महिन्यापासून वास्तव्यास असलेला हत्तीने आता शेतकऱ्यांच्या शिवारात धिंगाणा घालायला सुरुवात केली असून. रचलेल्या गवताच्या…

ByByMahadev Kudav Feb 26, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top