आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • स्पोर्ट्स
  • व्यंकटरावच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
Image

व्यंकटरावच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

सिरसंगी ची कन्या मधुरा प्रकाश दळवी यांची राज्यस्थरिय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

आजरा : येथील व्यंकटराव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आजरा येथील कु. मधुरा प्रकाश दळवी व कु. साधना महेश होसुरकर यांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच व्यंकटराव महाविद्यालयाने कबड्डी खेळातील आपले वर्चस्व कायम राखत नुकत्याच करवीर तालुक्यातील कोथळी येथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या महिला कबड्डी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत व्यंकटराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चुरशीचा सामना करत शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत द्वितीय क्रमांक मिळविला.

कबड्डी क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव करत विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल व्यंकटराव शिक्षण संकुलाचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी तसेच संचालक मंडळाने खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले.

यशस्वी महिला कबड्डी खेळाडू व मार्गदर्शक (एन.आय.एस.) शिक्षक पी. आर. तेरसे व कु. पी. एल. सासुलकर यांचा प्रत्यक्ष मैदानावर येऊन संस्थेचे संचालक व आजऱ्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. सचिन (भैय्या) शिंपी यांनी सत्कार केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. व्ही. शेळके तसेच प्रभारी प्राचार्य श्री. सी. एस. पन्हाळकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

मोरेवाडीत हत्तीचा धुमाकूळ; सिरसंगी परिसरात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिरसंगी प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील मोरेवडी धनगरवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून, भातपीक उसपीक व केळी बागेची नासधूस…

ByByMahadev Kudav Oct 10, 2026

केंद्रप्रमुख आनंदराव भादवणकर यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात 

सिरसंगी प्रतिनिधी : गवसे-उमगाव, ता. चंदगड येथील केंद्रप्रमुख श्री. आनंदराव शंकर भादवणकर यांच्या ३८ वर्षे ६ महिने ९…

ByByMahadev Kudav Oct 9, 2026

वाटंगी येथील पंढरीनाथ पतसंस्थेला १२ लाख ३७ हजारांचा नफा

चेअरमन शिवाजी नांदवडेकर यांची माहिती सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील श्री पंढरीनाथ सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

ByByMahadev Kudav Sep 27, 2026

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026
1 Comments Text
  • bet9jacasinologin says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Quick and reliable access to my favorite slots every time I log in. The bonus offers are fair and the withdrawal process is actually faster than other sites I have tried. Really appreciate the consistent updates on game variety. bet9jacasinologin
  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top