आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीत संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी
Image

सिरसंगीत संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी

संत गोरोबाकाका उत्साहात साजरी
शिरसंगी येथे संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले , त्यानंतर सकाळी दहा वाजता गावातून भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या वाद्यासाह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संत गोरोबा काकांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली . त्यानंतर सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला .दुपारी दोन ते चार पर्यंत गावातील विठ्ठल रुक्माई भजनी मंडळ रेणुका भजनी मंडळ विश्वकर्मा भजनी मंडळ महादेव भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी अमरोळी येथील भावेश्वरी महिला हरिपाठ मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मोदगे ता. हुकेरी येथील हभप स्वाती पाटील यांचे कीर्तन झाले त्यानंतर दहा वाजता कोल्हापूर येथील शाहीर सदाशिवराव निकम यांचा कार्यक्रम झाला ‌. गुरुवारी सकाळी दहा वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संत गोरोबाकाका पुण्यतिथीचे औचित्य साधून कुंभार समाजातर्फे “स्व. अनंतराव आजगावकर आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त मा. श्री. उत्तम कोकीतकर सर केंद्र शाळा विद्यामंदिर, सिरसंगी येथील पदवीधर अध्यापक यांचा सत्कार करण्यात आला .

श्री उत्तम कोकितकर सारांचा सत्कार करताना लक्ष्मण कुंभार , मधुकर कुंभार , केरबा कुंभार , अरुण कुंभार व महिला वर्ग .

संबंधित बातम्या

सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी :गणरायाच्या आगमनाने आजरा तालुक्यातील सिरसंगी, किणे, वाटंगी, कोळींद्रे परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByByMahadev Kudav Sep 14, 2026

तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व

सिरसंगी प्रतिनिधी आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व…

ByByMahadev Kudav Sep 12, 2026

सिरसंगीतील सुतार कुटुंबाची चौथी पिढी गणेशमूर्ती कलेचा वारसा जपत आहे

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी (ता. आजरा) येथील सुतार कुटुंबाची गणेशमूर्ती बनविण्याची परंपरा चौथ्या पिढीतही सुरू असून, दशरथ सुतार व…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा वार्षिक नफा

सिरसंगी प्रतिनिधी वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट…

ByByMahadev Kudav Sep 10, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top