आपली बातमी प्रसिद्ध करायची आहे?

स्थानिक बातमी किंवा जाहिरात हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा — जलद आणि विश्वासार्ह.

📲 आत्ताच संपर्क करा
  • Home
  • ब्लॉग
  • सिरसंगीच्या ‘लक्ष्या’ ची मनाला चटका देणारी ‘एक्जिट’
Image

सिरसंगीच्या ‘लक्ष्या’ ची मनाला चटका देणारी ‘एक्जिट’

सिरसंगी प्रतिनिधी

चिखली गुठयाचं रणमशींन म्हणून आजरा चंदगड गडहिंग्लज कागल तालुक्यात ओळख असलेला सिरसंगीच्या लक्ष्या चे आज बुधवार दि 29 रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले आणि आख्या बैल गाडी प्रेमी शौकीनावर दुखाचा डोंगर कोसळला . सिरसंगी येथील उद्योजक दिलीप जयाराम पाटील यांनी 2019 साली दीड लाखास आणलेला हा लक्ष्या अल्प काळातच आपल्या चपळाइणे व रुबाबदार चालीने सर्व बैलगाडी प्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला होता . प्रत्येक सिरसंगीकराला आपल्या चपळाईने आपलंस केल होत, लक्ष्या ने गेल्या सात वर्षात प्रत्येक चिखली गुठा स्पर्धेत बक्षीस घेतल्याशिवाय कधी परतलाच नसल्याची माहिती पाटील यांनी दिली . आजरा चंदगड गडहिंग्लज कागल तालुक्यात बैल गाडी स्पर्धा, चिखली गुठा स्पर्धा मध्ये सीरसंगीचे नाव लक्ष्यामुळे म्हणून प्रसिद्ध झाले होते . गेले चार दिवसंपासून लक्ष्याने आजारपणामुळे चारापाणी सोडले होते, पाटील यांनी सर्व उपचार केले पण अखेर बुधवारी दुपारी 11.30 वाजता लक्ष्याने अपली मालकीण विध्या दिलीप पाटील यांच्या हातचे पाणी पिऊन प्राण सोडले .

लक्ष्या सोबत मालक दिलीप पाटील

संबंधित बातम्या

आजऱ्यात घरफोडी – 15 तोळे सोने चांदीच्या दागिनेसह मोटर सायकलही केली लंपास

दोन घरात सोने चांदीवर मारला डल्ला तर जाताना माध्यमिक शिक्षकाची मोटरसायकलही केली लंपास सिरसंगी प्रतिनिधी आजरा येथे शिवकॉलनी…

ByByMahadev Kudav Jun 21, 2026

सिरसंगी केंद्र शाळा व आदर्श हायस्कूलमध्ये योगदिन उत्साहात

सिरसंगी प्रतिनिधी सिरसंगी केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला , यामध्ये शाळेचे मुख्याद्यापक शिवाजी बोलके ,…

ByByMahadev Kudav Jun 21, 2026

वि मं. पोश्रातवाडी शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडीतून

सिरसंगी प्रतिनिधी पोश्रातवाडी येथील वि मं . शाळेत नवागतांचे स्वागत बैलगाडी व वाद्यवृंदाच्या साथीने गावातून मिरवणूक काढून करण्यात…

ByByMahadev Kudav Jun 17, 2026

सिरसंगी केंद्रशाळेत नवागतांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणुकीने स्वागत

सिरसंगी प्रतिनिधी शिरसंगी केंद्र शाळेत नवीन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत श्री रवळनाथचे…

ByByMahadev Kudav Jun 16, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top