सिरसंगी प्रतिनिधी
मोदी किंवा बच्चन आपल्याला हवा देणार नाही तर झाडेच हवा देणार त्यामुळे वटवृक्षांना सेलिब्रिटी बनवा असे आवाहन शिरसंगी येथील महाकाय वटवृक्षाच्या भेटीदरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. त्यांच्यासोबत पुणे येथील वृक्षतज्ञ श्रीकांत ईंगीहळकर हेही उपस्थित होते. यावेळी सयाजी शिंदे यांनी महिलांना प्रवेश बंदी हे योग्य नसल्याचे सांगून आज आपण जुन्या प्रथा मोडून चांगल्या प्रथा निर्माण करणे गरजेचे असून आपण सर्वांनी महिलांना प्रवेश देऊन वृक्षाबरोबर महिलांचाही सन्मान करूया असे आवाहनही शिंदे यांनी केले.
सुरुवातीला सरपंच संदीप चौगुले यांनी सयाजी शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचबरोबर माजी प्राचार्य सी आर देसाई यांनी महाकाय वटवृक्षात असणाऱ्या काटेरी सावर , आंबा, जांभूळ, बहावा झाडासंदर्भात व महाकाय वटवृक्षा संदर्भात माहिती सांगितली त्याबरोबर वटवृक्षाच्या बुंध्याखाली असलेल्या गोठणदेव संदर्भात माहिती दिली. यावेळी वृशाल हुक्केरी, समीर पारधे, संतोष चौगुले, अनिल बुगडे, सकाळ पत्रकार रणजीत कालेकर, संतोष कांबळे, नंदकुमार दळवी, सागर कुंभार , योगेश बुडके उपस्थित होते.
यावेळी अभिनेते शिंदे यांनी महाकाय वटवृक्षाच्या रक्षणासाठी प्लास्टिकबंदी करावी झाडाच्या छायेखाली पडलेल्या प्लास्टिक बाटल्या यावर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही लावून प्लास्टिक फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, असा सल्लाही दिला. वृशाल हुक्केरी व सकाळ चे पत्रकार रणजीत कलेकर यांनी सयाजी शिंदे यांना पुस्तक भेट दिले.















